नारगुंडा येथे भव्य कृषी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST2021-07-14T04:42:30+5:302021-07-14T04:42:30+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच पूनम पदा यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आर.एफ.ओ. धुरवे, अंगणवाडी सेविका कमल पुंगाटी, वनरक्षक ...

नारगुंडा येथे भव्य कृषी मेळावा
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच पूनम पदा यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आर.एफ.ओ. धुरवे, अंगणवाडी सेविका कमल पुंगाटी, वनरक्षक मडावी, पोमके प्रभारी अधिकारी पाेलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, कुणाल चव्हाण, पोउपनि सानप, पोउपनि क्षीरसागर, गावपाटील बिरजू पुंगाटी आदी उपस्थित होते.
मेळाव्याला नारगुंडा, खंडी, नैनवाडी, कुचेर, पोकुर, हलवेर येथील जवळपास १५० नागरिक उपस्थित होते. नागरिकांना शासनाच्या कृषी व इतर विविध योजनांबाबत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी मार्गदर्शन केले. १५ जुलैरोजी ड्रायव्हिंग लायसेन्स कँप आयोजित करणार आहे. याच फायदा सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच आशावर्कर पदा यांनी मार्गदर्शन करताना कोरोना लस सर्वांनी घावी, असे आवाहन केले. नागरिकांना कृषी मेळाव्यात २८० किलाे ब्रिंदेश्वर धान,१३० किलाे जय श्रीराम धान, १० किलाे तूर व महिलांना १५ ब्लँकेट व १०० शेवगा झाड रोपटे आदी मोफत वाटप करण्यात आले.
130721\img-20210712-wa0030.jpg
शेतकऱ्यांना बीबियाने वाटप करतांना