ग्रामसेवक, शिक्षकांचा मुख्यालयाला खाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:21+5:302021-06-05T04:26:21+5:30
भेंडाळा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या कविता भगत यांनी शाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यासाठी सगनापूर गावाला भेट दिली असता ग्रामसेवक ...

ग्रामसेवक, शिक्षकांचा मुख्यालयाला खाे
भेंडाळा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या कविता भगत यांनी शाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यासाठी सगनापूर गावाला भेट दिली असता ग्रामसेवक व संबंधित शाळेतील शिक्षक गैरहजर आढळून आले. सगनापूर येथे भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य भगत यांनी नागरिकांशी संवाद साधला असता ग्रामसेवक कधीच वेळेवर येत नाही; तसेच मुख्यालयी राहत नाही, असे नागरिकांनी सांगितले. कविता भगत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांविराेधात तक्रार केली आहे. सगनापूर येथील ग्रामसेवक व शिक्षकसुद्धा मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांची काम अडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य कविता भगत यांनी केली आहे.
===Photopath===
030621\2208img-20210603-wa0145.jpg
===Caption===
जिल्हा परिषद सदस्या कविता भगत यांनी गडचिरोली जिल्हा परिषदे चे ceo यांना मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवका बद्दल तर्कारी चे निवेदन