शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ग्रामसेवकांच्या समस्या शासन दरबारी मांडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:53 IST

ग्रामसेवक हा गावपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणारा महत्त्वाचा कर्मचारी आहे.

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : गडचिरोलीत जिल्हास्तरीय ग्रामसेवक मेळावा; ग्रामसेवकांची लक्षणीय उपस्थिती

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : ग्रामसेवक हा गावपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणारा महत्त्वाचा कर्मचारी आहे. पूर्वीच्या तुलनेत आता ग्रामपंचायत स्तरावरील कामांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात अनेक ग्रामसेवक सेवा देऊन गाव विकासात सहकार्य करीत आहेत. मात्र या ग्रामसेवकांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. या समस्या आपण आग्रहीपणे शासन दरबारी मांडणार, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी स्थानिक आरमोरी मार्गावरील सूप्रभात मंगल कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय ग्रामसेवक मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जि.प. कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अशोक थूल व राज्याध्यक्ष रमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, शालिक धनकर, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना खासदार नेते म्हणाले, ग्रामसेवक हा गावाचा सेवक तर सरपंच हा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे ग्रामसेवकाला गावाचा मुख्य सचिव मानायला हरकत नाही. गाव विकासाची सर्व जबाबदारी सचिवावर असते. कोणताही दाखला हवा. संबंधितांना सचिवाकडेच जावे लागते. नरेगासह विविध योजना व विकासाचे कामे करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर आहे. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या मागण्या सरकार दरबारी मांडू, असे त्यांनी सांगितले.संघटनेतर्फे खासदारांचा सत्कारयाप्रसंगी ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने खासदार अशोक नेते यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, नवलाजी घुटके व इतर पदाधिकाºयांनी सत्कार केला.याप्रसंगी जि.प. कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी भाषणातून ग्रामसेवक व जि.प. कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या मांडल्या. यावेळी ते म्हणाले, विद्यमान सरकार ग्रामसेवक व जि.प.च्या विविध आस्थापनातील रिक्त पदे भरण्यास विलंब करीत आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केवळ १२ हजार रूपयांच्या अनुदानात शौचालयाचे बांधकाम करणे शक्य होत नाही. संगणक चालकांची पदे रिक्त असल्याने ग्रामसेवकांना कारभार सांभाळताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने ग्रामसेवकांची रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी चिलबुले यांनी केली.