गोठणगावचे ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST2021-07-07T04:45:55+5:302021-07-07T04:45:55+5:30

ग्रामसेवक मिसार यांच्या विरोधात ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनेतून साहित्य खरेदी प्रकरणात अनियमितता करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेकडून ...

Gramsevak of Gothangaon suspended | गोठणगावचे ग्रामसेवक निलंबित

गोठणगावचे ग्रामसेवक निलंबित

ग्रामसेवक मिसार यांच्या विरोधात ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनेतून साहित्य खरेदी प्रकरणात अनियमितता करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेकडून करण्यात आला हाेता. याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच मागील दोन मासिक सभेवर सरपंच उपसरपंच यासह सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला. सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरिता जि. प. उप मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. तेव्हा मिसार हे अनुपस्थित होते. त्यामुळे अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. गोठणगाव येथील प्रभार तात्पुरत्या स्वरूपात चांदागड येथील ग्रामसेवक एम. बी. लांजेवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मिसार यांच्याकडे दादापूर ग्रामपंचायतचा सुद्धा अतिरिक्त प्रभार होता. येथील प्रभार पुराडा येथील ग्रामसेवक निलेश जौंजाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती पंचायत समिती कुरखेडा येथील गट विकास अधिकारी अनिता तेलंग यांनी दिली आहे.

Web Title: Gramsevak of Gothangaon suspended