ग्रामपंचायतींच्या ऑपरेटर्सनी केला जीआरचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:05+5:302021-02-05T08:52:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सिराेंचा : ग्रामपंचायत कार्यालयात संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून मागील १० वर्षांपासून काम करीत ...

ग्रामपंचायतींच्या ऑपरेटर्सनी केला जीआरचा निषेध
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिराेंचा : ग्रामपंचायत कार्यालयात संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून मागील १० वर्षांपासून काम करीत असलेल्या संगणक परिचालकांच्या मानधनात केवळ एक हजार रुपयांची अत्यल्प वाढ करून ताेंडाला पाने पुसण्याचा शासनाने प्रयत्न केला. याअनुषंगाने १४ जानेवारी २०२१ राेजी ग्रामविकास विभागाने शासननिर्णय निर्गमित केला. या जीआरचा सिराेंचा तालुक्यातील संगणक परिचालकांनी निषेध केला. ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांना आता ७ हजार रुपये मानधन करण्यात आले आहे. महागाईच्या काळात संगणक परिचालकांनी या अत्यल्प मानधनात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून दिलेल्या सेवेच्या बदल्यात जखमेवर मीठ चाेळण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या विराेधात काळ्या फिती लावून संगणक परिचालकांनी शासननिर्णयाची हाेळी केली. संगणक परिचालक संघटना सिराेंचाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदाेलनादरम्यान संघटनेचे सिराेंचा तालुकाध्यक्ष विजय कादेबाेईना, उपाध्यक्ष संताेष भंडारी, सहसचिव मातय्या संगर्ती व इतर संगणक परिचालक उपस्थित हाेते.