ग्राम पंचायत निवडणुकीत पुरूषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST2021-01-10T04:28:25+5:302021-01-10T04:28:25+5:30
गडचिराेली : ग्रामपंचायतीच्या एकूण जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे महिलांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ...

ग्राम पंचायत निवडणुकीत पुरूषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या अधिक
गडचिराेली : ग्रामपंचायतीच्या एकूण जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे महिलांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. काही महिलांनी या संधीचे साेने करण्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. विशेष म्हणजे कुरखेडा व चामाेर्शी हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांचा आढावा घेतला असता, निवडणुकीच्या रिंगणात पुरूषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्हाभरात १९४१ महिला उमेदवार तर १९२६ पुरूष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बहुतांश ग्रामपंचायतमधील सदस्य संख्या ७, ९, ११ अशी विषम आहे. अशा ग्रामपंचायतीत पुरूषांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या एकने अधिक राहते. त्यामुळे पुरूषांच्या तुलनेत महिलांसाठी राखीव जागा सुद्धा अधिक आहेत.
बाॅक्स...
महिलांच्या आड पुरूषांचे राजकारण
ग्रामीण भागातील बहुतांश महिला राजकारणाबाबत फारशा जागरूक नाहीत. मात्र ग्रामपंचायतीत पुरूषांच्या तुलनेत महिलांसाठी आरक्षित जागा अधिक असल्याने पुरूष वर्गाला निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. तसेच पुरूषांसाठी असलेल्या जागेसाठी काट्याची लढत राहते. हे टाळण्यासाठी काही नागरिक आपल्या नात्यातील महिलेला उभे करतात. प्रत्यक्ष राजकारण व कारभार मात्र पुरूष मंडळी सांभाळत असल्याचे दिसून येते.