ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष
By Admin | Updated: May 3, 2015 01:07 IST2015-05-03T01:07:14+5:302015-05-03T01:07:14+5:30
२४ एप्रिल रोजी तीन तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली.

ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष
गडचिरोली : २४ एप्रिल रोजी तीन तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. तर ३० एप्रिल रोजी आठ तालुक्यातील २४१ ग्रामपंचायतीची निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदानानंतर गावागावात राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पॅनल लढविणारे नेते व गावातील काही नागरिक कोण विजयी होणार व कोण पराभूत होणार याचा अंदाज बांधत होते. २ मे रोजी शनिवारला दोन्ही टप्प्यात ग्रा.पं. निवडणुकीची मतमोजणी झाली. दुपारी ३.३० वाजतापर्यंत सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले. विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला.
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत एका गटाने प्रस्तापित गटाला धूळ चारत आपले वर्चस्व राखीत सात सदस्यांपैकी सहा सदस्य निवडून आणलेत. एक सदस्य अविरोध निवडून आला होता. वॉर्ड क्र. १ मधून बॉबी तुशार चनेकार, प्रमोद रामदास बावणे, वॉर्ड क्र. २ मधून प्रतिभा जीवनदास ठाकरे, लोमेश कुमरे यांनी तर वॉर्ड क्र. ३ मधून शोभा उमाजी लाजूरकर, पुरूषोत्तम सखाराम चनेकार यांनी विजय प्राप्त केला. गावात सायंकाळी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
धानोरा : तालुक्यातील २४ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. बहुतांश ग्राम पंचायतीमध्ये मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले.
तालुक्यातील सोडे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत चंदु किरंगे यांच्या पॅनलचे रामदास किरंगे, सुचित किरंगे, प्रियंका किरंगे आदी उमेदवार निवडून आले. तर चंद्रशेखर किरंगे, ममिता किरंगे हे उमेदवार निवडून आले.
तुकूम ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत विद्यमान सरपंच रेशमा तोफा या पराभूत झाल्या. या ग्राम पंचायतीमध्ये काशिनाथ उसेंडी, अमोल गेडाम, केसरी तोफा, पौर्णिमा मडावी, कोमल नरोटे आदीसह दोन सदस्य अविरोध निवडून आले.
मुरूमगाव या ११ सदस्यीय ग्राम पंचायतीमध्ये विद्यमान सरपंच अजमन रावटे हे वॉर्ड क्र. ३ मधून विजयी झाले. तर देवेंद्र भुरहिरिया, आशा आलाम, शिवप्रसाद गवर्णा, युनिर शेख, प्रियंका कुंजाम, प्रियंका नैताम, मानकू उईके आदी नवखे उमेदवार विजयी झाले. प्रियंका कुंजाम यांनी भाजपाच्या धानोरा तालुकाध्यक्ष लता पुंगाटे यांचा ३० मताने पराभव केला. तसेच रोहिदास मार्गीया, प्रज्ञा मेश्राम आदी दोन उमेदवार अविरोध निवडून आले.
चातगाव ग्रा. पं. मध्ये विद्यमान सरपंच गोपाल उईके यांचा जितेंद्र महादेव आत्राम यांनी ५२ मतांनी पराभव केला. गोपाल उईके यांच्या पत्नी गीता गोपाल उईके व राजू महादेव ठाकरे हे विद्यमान सरपंच गटाकडून विजय झाले. तसेच सुनंदा गावडे, लक्ष्मी सयाम, पुरूषोत्तम चुधरी, नीता मडावी, मंगला देबलवार, बाळू मेश्राम आदी उमेदवार निवडून आले.
दुधमाळा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत पिंगला जंबेवार, देविदास कुमोटी, मीना कोकोळे, नरेंद्र उईके, सुमित्रा गावतुरे आदी विजयी झाले. तसेच या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत दोन उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.
कारवाफा ग्राम पंचायतीमध्ये मतदारांनी नव्या उमेदवारांना संधी दिली. या ग्रा. पं. निवडणुकीत राकेशकुमार परसे, रामराव मंटकवार, प्रेमिला कुमरे, सुनंदा कंटकलवार, धनिराम कुमरे, दर्शना पदा आदी उमेवार विजयी झाले.
पेंढरी ग्रा. पं. निवडणुकीत विद्यमान सरपंच अरूणा शेडमाके पराभूत झाले. या ग्रा. पं. मध्ये योगेश आतला, पप्पू येरमे, वनिता निकोडे, भाग्यश्री चौधरी, सोनम पवार, अनिल आतला, काशिनाथ उसेंडी, प्रणिता दुगा, दर्शना आतला आदी नवखे उमेदवार विजयी झाले.
देसाईगंज : तालुक्यातील डोंगरगाव (ह) ग्राम पंचायतीमध्ये श्रीराम मानकर, तारा धनबाते, शाहिस्ता फिरोज खॉ पठाण, हिरामन गराटे, सुशीला नंदेश्वर, शुभांगी धनबाते, लालाजी मेश्राम, निर्मला नारनवरे आदी उमेदवार विजयी झाले तर चंद्रशेखर सीताराम नाकाडे हे नामाप्र गटातून अविरोध निवडून आले.
पिंपळगाव ग्रा. पं. मध्ये भजन भोयर, नंदा दोनाडकर, ज्योती धोंगडे, वंदना भोयर, गजेंद्र नाईक, शकुंतला लेंडे, यशोधा ठाकरे आदी उमेदवार निवडून आले. विहिरगाव ग्राम पंचायतीमध्ये अरूण बारकर, रमेश गरमळे, शेवंता जांभुळे, नितीन शंभरकर, लता प्रकाश पिलावन, शीला चंद्रशेखर मोहुर्ले आदी उमेदवार विजयी झाले. तर वर्षा विठ्ठल जुमनाके या अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून अविरोध निवडून आल्या. पोटगाव ग्रा. पं. मध्ये प्रेमचंद शेंडे, ओमकार दडमल, रजनी कुकुडकार, सुखदेव गोठे, मधुमाला दामले, सुवर्णा कळाम, विनायक धारगावे, रोशनी राऊत, रूपाली गावतुरे आदी उमेदवार विजयी झाले.
बोडधा ग्राम पंचायतीमध्ये भगवान गायकवाड, हरिश्चंद्र कोहळे, शकुंतला नंदेश्वर, मोहन गायकवाड, आनंदा आडे, अल्का गायकवाड, पुरूषोत्तम मेश्राम, मंदा लंजे, रिना मेश्राम, धनंजय नाकाडे, शीला डांगे आदी उमेदवार विजयी झाले. विसोरा ग्राम पंचायतीमध्ये नितीन बन्सोड, सुनील वाघमारे, सुशीला सहारे, चंद्रशेखर आंबेडोरे, मंगला देवढगले, संध्या बघमारे, शैलेश अवसरे, शीला परशुरामकर, किरण मानकर, लक्ष्मीकांत नाकाडे आदी उमेदवार विजयी झाले. आमगाव ग्राम पंचायतीमध्ये योगेश नाकतोडे, संगीता झरकर, लता सिद्धमवार, बेबीनंदा पाटील, अनिल चंडीकार, शुभांगी कोवासे, अनिल निकम, वासंती देशमुख, गीता भोयर, सुमन साखरे आदी उमेदवार विजयी झाले.
कुरूड ग्राम पंचायतीमध्ये प्रशाला गेडाम या दोन प्रभागातून अविरोध निवडून आल्या. प्रीती मडावी, वंदना निमजे अविरोध निवडून आल्या. तसेच अरूण राऊत, दादाजी भर्रे, जीवन उईके, किरण ढोरे, अविनाश गेडाम, गीता गणवीर, क्षितीज उके, मारोती मडावी, रूक्मा मडावी आदी उमेदवार विजयी झाले.
कोंढाळा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत कैलास राणे, सुरेखा बुराडे, सुनीता नेवारे, गजानन सेलोटे, वर्षा राऊत, रवींद्र शेंडे, गजानन राऊत, सुनील पारधी, मंगेला शेंडे, हिवता मेश्राम आदी उमेदवार विजयी झाले.
किन्हाळा ग्रा. पं. निवडणुकीत अविनाश नारनवरे, विमल नाकाडे, ऋषी दोनाडकर, वर्षा गुटखे, हिरालाल शेंडे, मंदा नारनवरे, माधुरी भागडकर आदी उमेदवार विजयी झाले. तर वैशाली भूमेश्वर शिंगाडे या अविरोध निवडून आल्या.
कोकडी ग्रा. पं. निवडणुकीत सुधीर वाढई, मंदा बन्सोड, पुष्पा विरघरे, मंसाराम बुद्धे, प्रतिभा सहारे, मंदा नेवारे, घनश्याम टिकले, सदानंद मोहुर्ले व अश्विनी रामटेके आदी उमेदवार विजयी झाले.
देसाईगंज तालुक्यातील चोप ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत कमलेश सुधाकर बारसकर, मीनाक्षी मुंडले, गौतम लाडे, नीलिमा डोंगरवार, लीला मुंडले, भरत केळझरकर, नंदकिशोर दुधकुवर, उर्मिला करपते, सत्यवती कुथे या उमेदवारांनी विजय संपादन केला. युवा परिवर्तन पॅनलचे वर्चस्व राहिले. तर भाजप, राष्ट्रवादी युतीचे अंगराज नेवारे, माधुरी वासनिक यांनी विजय संपादन केला. तुपटराव तितीरमारे यांनी सहकार क्षेत्रासोबतच ग्रा. पं. वरही आपले वर्चस्व अबाधीत ठेवले.
चामोर्शी : चामोर्शी तहसील कार्यालयात एकूण २० टेबल लावून मतमोजणी करण्यात आली. प्रत्येक टेबलवर तीन ते चार ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी व्ही. एम. तळपादे, तहसीलदार यु. जी. वैद्य, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, नायब तहसीलदार (निवडणूक) एस. के. चडगुलवार आदी उपस्थित होते.
तालुक्यातील मुरखळा चक ग्राम पंचायतीमध्ये पुनेश्वर बुद्धे, मीनाक्षा वाळके, प्रेमिला देऊरमले, मधुकर चिंतलवार, कल्पना मडावी, इंदिरा माडेमवार, भोजराज पेंदोर, अनिल ऐलावार, गोपिका गेडाम आदी उमेदवार विजयी झाले.
वसंतपूर ग्राम पंचायतीमध्ये तपन सरकार, कल्पना मंडल, बिजली हलदार, विनोद मंडल, रंजीता रॉय, चित्तरंजन टिकेदार, आलोक मिस्त्री आदी उमेदवार विजयी झाले.
फराडा ग्राम पंचायतीमध्ये बापू देशमुख, बेबी चुधरी, अर्चना नानोरकर, रघुनाथ आभारे, लोमेश मडावी, किरण साखरे, तुकाराम गेडाम, विद्या उंदीरवाडे, जयश्री वसाके आदी उमेदवार विजयी झाले.
तळोधी (मो.) ग्रा. पं. मध्ये बंडू चिळंगे, लक्ष्मी सातपुते, गीता सुरजागडे, पांडुरंग दुधबावरे, माधुरी सुरजागडे, प्रतीभा गडपल्लीवार, आनंदराव गेडाम, किशोर गडकोजवार, आशा डोंगरे, आकेश पातर, सत्यफुला कर्नासे आदी उमेदवार विजयी झाले.
विक्रमपूर ग्रा. पं. निवडणुकीत सुनील रॉय, लक्ष्मी बेपारी, अजय मंडल, सरस्वती मिर्धा, अनिल अधिकारी, सुमित्रा ढाली आदी उमेदवार विजयी झाले. तर दिलीप मंडल, प्रतीमा सरकार हे अविरोध निवडून आले.
कान्होली ग्रा. पं. निवडणुकीत जीवन म्हशाखेत्री, शरनाथ कुसराम, चंदा खेडेकर, हेमंत खेडेकर, शुभांगी कुथे आदी उमेदवार विजयी झाले. तर सिंधू शेंडे व सुषमा शेंडे ह्या महिला प्रवर्गातून अविरोध निवडून आल्या.
कुरूड ग्रा. पं. मध्ये नानाजी पेंदाम, वंदना धोडरे, परीक्षित रायसिडाम, रमेश सातपुते, वंदना मडावी, बाबुराव शेंडे, यांत्रिका गेडाम, वर्षा मुरकुटे आदी उमेदवार विजयी झाले. तर वनीता मेश्राम ह्या अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून अविरोध निवडून आल्या.
ईल्लूर ग्रा. पं. निवडणुकीत भाऊजी दुर्गे, हरिचंद्र मंगाम, मंगला मडावी, तुळशीराम मडावी, फुलाबाई मडावी, सुरेखा वनकर, रामचंद्र बामनकार, निरंजना मडावी, शर्मिला बामनकार आदी उमेदवार विजयी झाले. मोहुर्ली (मो.) ग्रा. पं. निवडणुकीत योगेश्वर आगरे, सुमन चापले, मारोती आगरे, उर्मिला मडावी, दिवाकर जवादे, प्रतिमा चरडुके, शारदा मोहुर्ले आदी विजयी झाले.
मार्र्कं डा (कं.) ग्राम पंचायतीमध्ये रवींद्र कोवे, प्रशांत दंडकेवार, अनीता अवसरमोल, भारती पोटवार, राजेश आत्राम, ताराबाई शेडमाके, ज्योती कातला, नंदा बिटपल्लीवार, वैशाली कन्नाके आदी उमेदवार विजयी झाले.
दोटकुली ग्रा. पं. मध्ये जानकिराम धोबे, दीपा भोयर, संगीता भोयर, श्रीरंग बोदलकर, सतीश पुटकमवार, कविता पोरटे आदी विजयी झाले. तर संदीप पिपरे, रोशना सहारे, हायसला गव्हारे हे तीन उमेदवार अविरोध निवडून आले.
कुनघाडा माल ग्रा. पं. मध्ये योगेश पेंदाम, मधुकर पुप्पलवार, कीर्ती पेंदाम, भगीरथ पेंदाम, माया कन्नाके आदी उमेदवार अविरोध निवडून आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)