ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घाला
By Admin | Updated: October 24, 2015 01:13 IST2015-10-24T01:13:02+5:302015-10-24T01:13:02+5:30
अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरात ग्राम पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी पुन्हा बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.

ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घाला
माओवाद्यांचा इशारा : कमलापूर परिसरात फलक लावला
गडचिरोली : अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरात ग्राम पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी पुन्हा बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.
या स्थितीत कमलापूर, रेपनपल्ली, दामरंचा या तीन ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत आहे. दामरंचा ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून कमलापूर व रेपनपल्ली ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी उमेदवार सज्ज होत आहे. प्रत्येक निवडणुकीत माओवादी बहिष्काराचे आवाहन करीत असतात व परिसरात बॅनर व पत्रक लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असतात. गेल्या पाच वर्षांच्या काळात विशिष्ट पक्षांनीच गोपनीय पद्धतीने आपल्या लोकांचे उमेदवारी अर्ज भरून सत्ता हस्तगत केली. मात्र यंदा दोन गटाने नामांकन अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
नामनिर्देशन पत्र वापस घेईपर्यंत कुठल्याही हालचाली माओवाद्यांकडून नव्हत्या. परंतु दसऱ्याच्या आदल्या दिवशी माओवाद्यांनी पत्रक टाकून पुन्हा बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.
कमलापूर ग्राम पंचायतीत तीन वॉर्डातून नऊ सदस्य निवडावयाचे आहे. २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. १८ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)