स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदारांनी दिले धरणे

By Admin | Updated: February 21, 2015 01:15 IST2015-02-21T01:15:58+5:302015-02-21T01:15:58+5:30

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतेतील दोष काढून वितरण व्यवस्था सक्षम करावी,

Grain of cheap grains and kerosene shops | स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदारांनी दिले धरणे

स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदारांनी दिले धरणे

गडचिरोली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतेतील दोष काढून वितरण व्यवस्था सक्षम करावी, या प्रमुख मागणीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील स्वस्त धान्य विक्रेते व केरोसीन परवानाधारकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणातून राज्य व केंद्र शासन स्वस्त धान्य विक्रेते व केरोसीन परवानाधारकांवर तसेच लाभार्थ्यांवर अन्याय करीत असल्याची टिका केली. या धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कैलाश शर्मा, सचिव अनिल भांडेकर, अनिल किरमे, दादाजी माकडे, नादीर लालानी, रमेश सरोदे, रविंद्र निंबेकार, राजू रामटेके, जब्बार शेख, चंद्रकांत दरडे, सुरेश बांबोळे, आसाराम तिवारी, नेहा वैद्यवार, राजेंद्र कुकुडकार, आर. एन. पिपरे, रमेश बगमारे आदीसह जिल्हाभरातील ३०० हून अधिक केरोसीन परवानाधारक, स्वस्त धान्य विक्रेते व स्वस्त धान्य दुकान चालविणाऱ्या बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.
त्यानंतर संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली. (स्थानिक प्रतिनिधी)
माजी अन्न पुरवठा मंत्र्यांची आंदोलनाला भेट
४जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या स्वस्त धान्य विक्रेते व केरोसीन परवानाधारकांच्या धरणे आंदोलनाला राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठामंत्री रमेश बंग यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केले. केंद्र व राज्य शासनाचे स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आ. प्रकाश गजभिये, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
४स्वस्त धान्य दुकानदारांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा
४कमिशन न देता थेट मानधन देण्यात यावा
४केरोसीन दुकानातून गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात यावे
४बंद असलेल्या एपीएल केशरी कार्डधारकांचे धान्य सुरू करण्यात यावे
४सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्याची रोख सबसीडी न देता धान्यच देण्यात यावे
४ग्रामीण भागातील १०० टक्के लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा
४विक्रेत्यांना मानधन, दुकानभाडे, विद्युत बिल, वाहतूक खर्च देण्यात यावा
४पिवळ्या बीपीएल कार्डधारकाना प्रती कार्ड ३५ किलो धान्य देण्यात यावे
४अन्न धान्याची तूट देण्यात यावी

Web Title: Grain of cheap grains and kerosene shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.