गुळाने भरलेला ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:47 IST2017-08-25T23:46:55+5:302017-08-25T23:47:17+5:30
दारू काढण्यासाठी वापरण्यात येणाºया गुळानी भरलेला ट्रक अहेरी तालुक्यातील बोरी येथे मुक्तीपथचे कार्यकर्ते व अहेरी पोलिसांनी पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

गुळाने भरलेला ट्रक पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : दारू काढण्यासाठी वापरण्यात येणाºया गुळानी भरलेला ट्रक अहेरी तालुक्यातील बोरी येथे मुक्तीपथचे कार्यकर्ते व अहेरी पोलिसांनी पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील व्यंकटेश ट्रेडर्सकडून गडचिरोली जिल्ह्यातील बोरी मार्गे अहेरी येथील मनोज किराणा दुकानात ४.५० लाख रुपये किमतीचा अंदाजे २१ टन काळा गुळ आणत असल्याची गुप्त माहिती मुक्तीपथ व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यकर्त्यांना मिळाली. शुक्रवारी दुपारी एमपी २८ एच १०४३ या क्रमांकाचा ट्रक संशयीत आढळल्याने कार्यकर्त्यांनी हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर ट्रक थांबविण्यात आला नाही. त्यानंतर पाठलाग करून मुक्तीपथचे कार्यकर्ते व गावकºयांनी सदर ट्रक दीना नदी जवळ पकडला. लगेच याची माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांना देण्यात आली. त्यानंतर बीट हवालदार लक्ष्मण मोहुर्ले यांनी ट्रक ताब्यात घेऊन ट्रक अहेरी पोलीस ठाण्यात जमा केला. ट्रकची पाहणी केली असता यात काळा गुळ होता. काळ्या गुळवर बंदी असून त्याचा वापर परिसरात गुळाची दारू बनविण्यासाठी होतो. ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास अहेरीचे एसडीपीओ गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने, पोलीस उपनिरीक्षक तांबूसकर, चांगदेव कोळेकर, लक्ष्मण मोहुर्ले करीत आहे.