गोयल यांनी केली रोहयो कामाची पाहणी
By Admin | Updated: June 14, 2016 00:49 IST2016-06-14T00:49:33+5:302016-06-14T00:49:33+5:30
तालुक्यातील रामराजपूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मंडलापूर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी

गोयल यांनी केली रोहयो कामाची पाहणी
मजुरांसोबत चर्चा : मंडलापूर गावाला भेट
सिरोंचा : तालुक्यातील रामराजपूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मंडलापूर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी १० जून रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी केली.
यावेळी त्यांच्यासोबत सिरोंचाचे संवर्ग विकास अधिकारी पी. एल. मरस्कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी मेश्राम, शाका अभियंता एस. जी. जाधव, विस्तार अधिकारी परशुरामकर, माकडे, उपसरपंच रवी राजन्ना संतोषपू, सचिव डी. ए. वायबसे, ग्रामरोजगार सेवक नागराजू बिरेली आदी उपस्थित होते.
मंडलापूर येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर शेकडो मजूर काम करीत आहे. सीईओ गोयल यांनी रोहयोच्या मजुरांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून रोहयोच्या कामाची माहिती घेतली. (प्रतिनिधी)