मॉडेल स्कूल सुरू ठेवण्यावर राज्यपालांची सकारात्मक भूमिका

By Admin | Updated: July 9, 2015 01:40 IST2015-07-09T01:40:18+5:302015-07-09T01:40:18+5:30

जिल्ह्यातील मॉडेल स्कुल पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी ....

The Governor's positive role is to continue the model school | मॉडेल स्कूल सुरू ठेवण्यावर राज्यपालांची सकारात्मक भूमिका

मॉडेल स्कूल सुरू ठेवण्यावर राज्यपालांची सकारात्मक भूमिका

पारोमिता गोस्वामी यांची माहिती : वित्तमंत्र्यांशीही झाली चर्चा
गडचिरोली : जिल्ह्यातील मॉडेल स्कुल पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी राजभवनात राज्यपाल डॉ. सी. विद्यासागरराव यांची भेट घेतली व त्यांच्याशी गडचिरोली जिल्ह्यातील पाच मॉडेल स्कूल सुरू ठेवण्याच्या संदर्भात चर्चा केली. राज्यपालांनी या प्रश्नावर अतिशय सकारात्मक भूमिका घेतली.
पालकांनी राजभवन येथे राज्यपाल विद्यासागरराव यांचेसोबत चर्चा केल्यानंतर मंत्रालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामुळे मॉडेल स्कुलमध्ये नवीन प्रवेश सुरू होऊन सदर शाळा कायम राहण्याची आशा निर्माण झाली आहे.
गडचिरोली या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यात २०११-१२ पासून केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने पाच मॉडेल शाळा सुरू करण्यात आल्या होते. सदर शाळा जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा, धानोरा (मोहली), एटापल्ली व आलापल्ली या पाच ठिकाणी सुरू होत्या. या शाळांमधून पहिल्यांदाच अतिदुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळत होते. मात्र यावर्षी अचानक या शाळा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. व येथील विद्यार्थ्यांचे समायोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्याचे आदेश शासनस्तरावरून देण्यात आले.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर १ जुलैपासून शाळा पूर्ववत सुरू ठेवण्याचे आश्वासन शासनस्तरावरून देण्यात आले. मात्र नवीन प्रवेश न घेता हळुहळु ही शाळा बंद करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असल्याने पूर्वीप्रमाणे सहाव्या वर्गापासून शाळा सुरू ठेवावी ही मागणी घेऊन मुंबई येथील राजभवनमध्ये राज्यपाल विद्यासागरराव यांची श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात शिष्ठमंडळानी भेट घेतली.
गडचिरोलीचा मानव विकास निर्देशांक देशात सर्वात कमी असल्याने शाळा पुर्ववत सुरू ठेवण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. या मागणीची राज्यपालांनी दखल घेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा केली व या मागणीकडे त्यांनी शासनाचेही लक्ष वेधले.
या बैठकीत राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मंत्रालयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अध्यक्षतेखाली मॉडेल स्कुल सुरू ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. वित्तमंत्र्यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांना विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत या शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, विजय कोरेवार, सिताराम बडोदे, ईश्वर पुंगाटी, विद्याथीर्नी कोमल नरोटे, विनोद गंपावार, संगिता गेडाम, दौलत मडावी, सुधाकर तोडासे, महेश तिवारी आदी सहभागी होते. निर्णयामुळे शाळा सुरू होतील. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The Governor's positive role is to continue the model school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.