राज्यकर्त्यांनी आरक्षणाचा बाजार मांडला आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 01:06 IST2016-12-23T01:06:45+5:302016-12-23T01:06:45+5:30

आरक्षण हे मागासवर्गीय व अविकसित आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक अशांना समाजाच्या मुख्य प्रवाहात

Governors have set up a reservation market! | राज्यकर्त्यांनी आरक्षणाचा बाजार मांडला आहे!

राज्यकर्त्यांनी आरक्षणाचा बाजार मांडला आहे!

संताजी पुण्यतिथी : वैरागड येथे तेली समाज मेळाव्यात मान्यवरांचा सूर
वैरागड : आरक्षण हे मागासवर्गीय व अविकसित आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक अशांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने काही काळासाठी आरक्षणाची तरतूद केली होती. परंतु येथील राज्यकर्त्यांनी आता आरक्षणाचा बाजार मांडला आहे. राज्यात १७ टक्के तेली समाजाची लोकसंख्या असल्याने ८ टक्के आरक्षण तेली समाजाला देण्यात यावे, असे प्रतिपादन तेली समाज आरक्षण समितीचे संयोजक योगेश समरित यांनी केले.
वैरागड येथे २१ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम व तेली समाज मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे होते. मेळाव्याचे उद्घाटन देसाईगंज पं. स. चे माजी सभापती परसराम टिकले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गडचिरोलीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे, प्राचार्य पी. आर. आकरे, भाजपचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, सरपंच लिलाबाई मुंडले, सरपंच गौरी सोमनानी, माजी प्राचार्य कुडवे, मुख्याध्यापक मेहर, शंकरराव बावनकर, माजी जि. प. सदस्य केतू गेडाम, कनिष्ठ अभियंता भोवरे, विलास चिलबुले, बिट जमादार सहारे, क्षेत्र सहायक मेश्राम, वनरक्षक श्रीकांत सेलोटे, पी. एम. खोब्रागडे, पी. ए. हुमने, पोलीस पाटील भानारकर, तलाठी कुबडे, संगीता मेश्राम, ग्रामविकास अधिकारी भांडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगदीश पेंदाम, विलास खापरे, संगीता धनकर, नलू आत्राम, मुन्नेश्वर मडावी, नलीनी सहारे, नामदेव धनकर, महादेव दुमाने, डोनू कांबळे, भोजराज येरने, माजी सरपंच सेवानंद सहारे, वसुधा तावेडे आदी उपस्थित होते. यावेळी सकाळी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तेली समाज मेळाव्यात नवनियुक्त नगराध्यक्ष योगीता पिपरे यांचा तेली समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक भास्कर बोडणे तर संचालन प्रा. प्रदीप बोडणे तर आभार हरेश बावनकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुखरू खोब्रागडे, नेताजी बोडणे, घनश्याम लांजेवार, मनोहर बावनकर, पांडुरंग बावनकर, पीतांबर लांजेवार, सुखदेव बोडणे, विश्वनाथ ठेंगरे, दत्तू सोमनकर, रेखा बोधनकर, गायत्री आकरे, निर्मला क्षिरसागर, रेखा आकरे आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Governors have set up a reservation market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.