शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष
By Admin | Updated: October 9, 2015 01:56 IST2015-10-09T01:56:46+5:302015-10-09T01:56:46+5:30
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव, कर्जमाफी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष
काँग्रेसचा आरोप : गोगाव येथे कार्यकर्ता मेळावा
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव, कर्जमाफी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप तालुक्यातील गोगाव-अडपल्ली येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. यावेळी पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राह्मणवाडे, लता पेदापल्ली, शंकरराव सालोटकर, सतीश विधाते, रजनिकांत मोटघरे, जीवन कुत्तरमारे, नंदू वाईलकर, नितेश राठोड, पांडुरंग घोटेकर, वासेकर, कालिदास चापले, भडके, अमिता मडावी, बालू मुपिडवार, अमर नवघडे, केवळराम नंदेश्वर, गौरव अलाम, राकेश गणवीर, राकेश गरपल्लीवार, प्रतीक बारसिंगे उपस्थित होते.