शासकीय कार्यालये भाड्याच्या खोलीत

By Admin | Updated: September 5, 2016 01:40 IST2016-09-05T01:40:42+5:302016-09-05T01:40:42+5:30

वाढत्या लोकसंख्येबरोबरच शासकीय कार्यालयांवरील कामाचा बोजा वाढत चालला असला तरी सदर कार्यालये भाड्याच्या इमारतीत तुटपुंज्या जागेत

Government Offices in the Rental Room | शासकीय कार्यालये भाड्याच्या खोलीत

शासकीय कार्यालये भाड्याच्या खोलीत

देसाईगंजातील परिस्थिती : अपुऱ्या जागेमुळे नागरिक व कर्मचारी त्रस्त
देसाईगंज : वाढत्या लोकसंख्येबरोबरच शासकीय कार्यालयांवरील कामाचा बोजा वाढत चालला असला तरी सदर कार्यालये भाड्याच्या इमारतीत तुटपुंज्या जागेत चालविली जात आहेत. त्यामुळे गैरसोयीचा सामना कर्मचाऱ्यांसोबतच नागरिकांनाही करावा लागत आहे. अनेक कार्यालये स्वतंत्र इमारतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.
देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानकाची सुविधा उपलब्ध असलेले शहर आहे. त्याचबरोबर औद्योगिकदृष्ट्या इतर शहरांच्या तुलनेत हे शहर प्रगत मानले जाते. शहरामध्ये कृषी विभाग, स्टेट बँक आॅफ इंडिया, वीज विभाग, पोस्ट आॅफीस आदी विभागांचे कार्यालये आहेत. मात्र या कार्यालयांना स्वत:ची इमारत उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा निर्मितीपासून सदर कार्यालय भाड्याच्या खोलीत अत्यंत अपुऱ्या जागेत चालविली जात आहेत. या कार्यालयांमध्ये नागरिकांना वाहने उभी ठेवण्यासाठी पार्कींगची सुविधा सुध्दा उपलब्ध नाही. काही इमारती गळत असून यामुळे शासकीय दस्तावेज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इमारती बांधून द्याव्या, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Government Offices in the Rental Room