बिनागुंडा पहाडीवरचा गोरगा भामरागडात दाखल

By Admin | Updated: August 28, 2016 01:39 IST2016-08-28T01:39:36+5:302016-08-28T01:39:36+5:30

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या बिनागुंडा पहाडीवरील गोरगाची झाडे भामरागडात

Gorga in Nagergunda falls to Bhamragarad | बिनागुंडा पहाडीवरचा गोरगा भामरागडात दाखल

बिनागुंडा पहाडीवरचा गोरगा भामरागडात दाखल

आठवडी बाजारात खरेदीसाठी लागली रांग : ५० ते १०० रूपये दराने होत आहे रोप व बियांची विक्री
रमेश मारगोनवार  भामरागड
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या बिनागुंडा पहाडीवरील गोरगाची झाडे भामरागडात विक्रीसाठी आणली जात असून ही झाडे ५० ते १०० रूपये प्रती नग दराने विकली जात आहेत. वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष करणारे नागरिक मात्र गोरगाची झाडे स्वत: खरेदी करून त्यांचे संगोपण करण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
गोरगा झाडाच्या बुंद्यातून पाझरणाऱ्या द्रव्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो. या द्रव्यामुळे नशा चढत असल्याने गोरगा द्रव्य खरेदी करण्यासाठी मोठी रांग भामरागडात दिसून येते. भामरागड परिसरात ताडाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र गोरगाची झाडे फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. गोरगाची झाडे मोठ्या प्रमाणात लाहेरी व बिनागुंडा परिसरात आढळून येतात.
भामरागडात २० ते ३० रूपये दराने गोरगा द्रव्याची बॉटल विकली जात असल्याने काही नागरिक गोरगाची झाडे लावण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे बिनागुंडा, लाहेरी येथील काही युवकांनी बुधवारी भरणाऱ्या भामरागड येथील आठवडी बाजारात दोन ते तीन फूट उंचीची गोरगाची झाडे विक्रीसाठी आणली. त्याचबरोबर गोरगा झाडाच्या बिया सुध्दा विक्रीस आणल्या होत्या. सदर बिया व झाडे अगदी २० मिनिटात विकल्या गेली.
वृक्ष लागवडीसाठी शासनाकडून नागरिकांना आवाहन केले जाते. घरापर्यंत रोपटे पोहोचवून दिल्या जाते. तरीही नागरिक वृक्षारोपण करीत नाही व वृक्ष लावले तरी त्याचे संगोपण करीत नाही. मात्र गोरगाची झाडे खरेदी करण्यास मोठी रांग लागली होती. बिनागुंडातून गोरगाचे वृक्ष विक्रीसाठी आणले जात असल्याने भामरागड परिसरातही ताडांच्या झाडा प्रमाणेच गोरगाच्या झाडांचेही संख्या वाढत चालली आहे.

Web Title: Gorga in Nagergunda falls to Bhamragarad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.