शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वीच गोपाल व कुंदावर नियतीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:01 IST

रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.

ठळक मुद्दे१० जूनला होता कार्यक्रम : अहेरीजवळील अपघात ठरला त्यांच्यासाठी काळ

प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यावर नियतीने डाव साधला. अहेरीजवळ सोमवारी रात्री झालेल्या अपघातात लग्नाच्या तयारीला लागलेले गोपाल व कुंदा हे दोघेही ठार झाले. त्यामुळे या दोघांनीही सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.गोपाल महतो हा मूळचा अहेरीचा रहिवासी आहे, तर कुंदा गावडे ही एटापल्ली तालुक्यातील बिड्री गावची रहिवासी आहे. गोपाल व कुंदा एकमेकांना खुप वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गोपाल हा अहेरी उपजिल्हा रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत होता. तर कुंदा हिने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केला होता. एप्रिल महिन्यात गोपाल व कुंदाने नोंदणी पध्दतीने विवाह केला. कुंदा ही आदिवासी समाजाची असल्याने ती गावात लग्नाचा छोटेखानी कार्यक्रम करणार होती. त्यानंतर १० जून रोजी अहेरी येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवण्याचे ठरले होते. याच संबंधात कुंदाच्या नातेवाईकांसोबत चर्चा करण्यासाठी दोघेही अहेरीवरून बिड्री गावाकडे दुचाकीने निघाले होते. मात्र अहेरीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर दोन दुचाकींची समारोसमोर धडक झाली. यात गोपाल हा जागीच ठार झाला. कुंदा सुध्दा गंभीर जखमी झाली होती. कुंदाला अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान कुंदाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. गोपाल व कुंदाच्या अकाली निधनाने महतो व गावडे परिवारावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. गोपाल अहेरी रूग्णालयात काम करीत असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. मनमिळावू स्वभावाचा व प्रत्येकीच्या मदतीला धाऊन जाणारा कर्मचारी म्हणून गोपालची रूग्णालयात ओळख होती. दोघांवरही अहेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.हेल्मेटने वाचले असते प्राणअहेरीजवळ झालेल्या अपघातात गोपाल, कुंदा यांच्यासह दुसरा दुचाकीस्वार संतोष दुधलवार हे तिघे ठार झाले. या तिघांच्याही डोक्याला मार लागला होता. वाहतुकीचे नियम पाळून दुचाकीस्वारांनी डोक्यात हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. अहेरी-आलापल्ली मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून रात्रीचा प्रवास धोकादायक व खडतर झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू