शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सद्भावना पंधरवडा साजरा

By admin | Updated: September 9, 2014 00:23 IST

देसाईगंज व कोरची येथे सद्भावना पंधरवडादरम्यान युवकांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन, कार्यशाळा, निबंध स्पर्धा व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. पंधरवडादरम्यान

देसाईगंज/कोरची : देसाईगंज व कोरची येथे सद्भावना पंधरवडादरम्यान युवकांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन, कार्यशाळा, निबंध स्पर्धा व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. पंधरवडादरम्यान महाविद्यालयाच्यावतीने जनजागृतीही करण्यात आली. या सद्भावना पंधरवड्याचा समारोप शनिवारी करण्यात आला.देसाईगंज येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयात सद्भावना पंधरवड्याचा समारोप प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एच. बी. धोटे, प्रा. डॉ. एच. एम. कामडी, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुभाष उपाते, प्रा. रमेश धोटे, डॉ. एस. के. सिंग आदी उपस्थित होते. सद्भावना पंधरवडादरम्यान भाषा व साहित्य विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, रोजगार मार्गदर्शन, जीवन विमा निगम संदर्भात कार्यशाळा, नोंदणी प्राप्त स्वयंसेवकांसाठी उद्बोधन, निबंध व भित्तीचित्र स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी समाजातील विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती कर्तव्यनिष्ठा जोपासावी, असे समारोपीय कार्यक्रमात प्राचार्य डॉ. बाळबुद्धे यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक बांधीलकीला अनुसरून विद्यार्थ्यांनी कर्तव्य पार पाडावे, विद्यार्थ्यांनी सहकार्याची भावना जोपासावी, असे प्रतिपादन डॉ. हितेंद्र धोटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महेश दिवटे, प्रास्ताविक रमेश धोटे तर आभार पल्लवी हुलके हिने मानले.कोरची येथील वनश्री महाविद्यालयात सद्भावना पंधरवडा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एस. दोनाडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आर. एस. रोटके, सी. एस. मांडवे, प्रा. पी. के. चापले, प्रा. श्रीरामे उपस्थित होते. सद्भावना पंधरवडादरम्यान महाविद्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश कोसारे, राजेश देवरे, श्रीकांत वाघाडे, मनीषा बोरकर, गायत्री चौधरी, कोसनकर, सुप्रिया मोहबे, भूमेश्वर शेंडे, भूपेंद्र कोसारे, गुलशन टेंभुर्णे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)