सद्भावना पंधरवडा साजरा

By Admin | Updated: September 9, 2014 00:23 IST2014-09-09T00:23:26+5:302014-09-09T00:23:26+5:30

देसाईगंज व कोरची येथे सद्भावना पंधरवडादरम्यान युवकांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन, कार्यशाळा, निबंध स्पर्धा व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. पंधरवडादरम्यान

Goodwill celebrates fifteen | सद्भावना पंधरवडा साजरा

सद्भावना पंधरवडा साजरा

देसाईगंज/कोरची : देसाईगंज व कोरची येथे सद्भावना पंधरवडादरम्यान युवकांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन, कार्यशाळा, निबंध स्पर्धा व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. पंधरवडादरम्यान महाविद्यालयाच्यावतीने जनजागृतीही करण्यात आली. या सद्भावना पंधरवड्याचा समारोप शनिवारी करण्यात आला.
देसाईगंज येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयात सद्भावना पंधरवड्याचा समारोप प्राचार्य डॉ. पी. एच. बाळबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एच. बी. धोटे, प्रा. डॉ. एच. एम. कामडी, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुभाष उपाते, प्रा. रमेश धोटे, डॉ. एस. के. सिंग आदी उपस्थित होते. सद्भावना पंधरवडादरम्यान भाषा व साहित्य विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, रोजगार मार्गदर्शन, जीवन विमा निगम संदर्भात कार्यशाळा, नोंदणी प्राप्त स्वयंसेवकांसाठी उद्बोधन, निबंध व भित्तीचित्र स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी समाजातील विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती कर्तव्यनिष्ठा जोपासावी, असे समारोपीय कार्यक्रमात प्राचार्य डॉ. बाळबुद्धे यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक बांधीलकीला अनुसरून विद्यार्थ्यांनी कर्तव्य पार पाडावे, विद्यार्थ्यांनी सहकार्याची भावना जोपासावी, असे प्रतिपादन डॉ. हितेंद्र धोटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महेश दिवटे, प्रास्ताविक रमेश धोटे तर आभार पल्लवी हुलके हिने मानले.
कोरची येथील वनश्री महाविद्यालयात सद्भावना पंधरवडा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एस. दोनाडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आर. एस. रोटके, सी. एस. मांडवे, प्रा. पी. के. चापले, प्रा. श्रीरामे उपस्थित होते.
सद्भावना पंधरवडादरम्यान महाविद्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश कोसारे, राजेश देवरे, श्रीकांत वाघाडे, मनीषा बोरकर, गायत्री चौधरी, कोसनकर, सुप्रिया मोहबे, भूमेश्वर शेंडे, भूपेंद्र कोसारे, गुलशन टेंभुर्णे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Goodwill celebrates fifteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.