शुटिंगमध्ये गोंडवानाचे विद्यार्थी चमकले

By Admin | Updated: August 29, 2016 02:17 IST2016-08-29T02:17:03+5:302016-08-29T02:17:03+5:30

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय

Gondwana students shine in shooting | शुटिंगमध्ये गोंडवानाचे विद्यार्थी चमकले

शुटिंगमध्ये गोंडवानाचे विद्यार्थी चमकले

जिल्हास्तरीय स्पर्धा : इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम; विभागीय स्पर्धेसाठी निवड
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रायफल शुटिंगचे आयोजन गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या रायफल शुटिंग रूममध्ये करण्यात आले होते. या शुटिंगमध्ये गोंंडवाना सैैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
१९ वर्ष वयोगटात कॅडेट मास्टर साहील मोगरे, पंकज मडावी, ऋषीकेश हलामी यांना अनुक्रमे गोल्ड, सिल्वर व ब्राँझ अशी मेडल मिळाली. त्याचप्रमाणे १७ वर्ष वयोगटात पुनेश्वर देवतळेला सुवर्ण, रोहित संग्रामेला सिल्वर, रोहित इरपाते व स्वप्नील राजारपू यांना ब्राँझ मेडल मिळाले. १४ वर्ष वयोगटात मोहित कोडापे, पियूष गुरडे, स्वप्नील नैताम यांना अनुक्रमे गोल्ड, सिल्वर व ब्राँझ अशी मेडल मिळाली.
या तिन्ही संघाची विभागीयस्तरासाठी निवड झाली आहे. स्पर्धेचे परीक्षण प्रल्हाद हुलके, बनकर यांनी केले. या सर्व विद्यार्थ्यांना मिल्ट्री मुख्य प्रशिक्षक सुबेदार खान यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर, प्राचार्य संजीव गोसावी, पर्यवेक्षक अजय वानखेडे, ओम संग्रामे यांनी कौतुक केले आहे. रायफल शूट स्पर्धेला आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप महत्त्व आहे. सैनिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Gondwana students shine in shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.