मालदुगी येथे गोंडीधर्म संमेलन

By Admin | Updated: March 2, 2016 01:57 IST2016-03-02T01:57:19+5:302016-03-02T01:57:19+5:30

पहांदीपारी कुपारलिंगो गोंडीधर्म महासंघाच्या वतीने तालुक्यातील मालदुगी येथे दोन दिवसीय गोंडीधर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

Gondidharma Sammelan at Maldugi | मालदुगी येथे गोंडीधर्म संमेलन

मालदुगी येथे गोंडीधर्म संमेलन

मार्गदर्शन : वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण
कुरखेडा : पहांदीपारी कुपारलिंगो गोंडीधर्म महासंघाच्या वतीने तालुक्यातील मालदुगी येथे दोन दिवसीय गोंडीधर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संमेलनाचे उद्घाटन राजे वासुदेवशहा टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आनंद मडावी होते. ध्वजारोहण माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. पुतळ्याचे अनावरण सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक निताराम कुमरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. हरिराम वरखडे, श्यामकांत मडावी, प्रकाश सलामे, खुशाल सुरपाम, मारोती उईके, मणिरावण दुग्गा, रंजना उईके, अ‍ॅड. सुफरंजन उसेंडी, प्राचार्य डॉ. विजयकुमार खंडाते, प्रा. दौलत धुर्वे, रमेश कोरचा, प्रा. अर्चना खंडाते, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, अ‍ॅड. लालसू नरोटे, डॉ. पीतांबर कोडापे, सदानंद ताराम, संदीप वरखडे, यशोधरा नंदेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की, गोंडी संस्कृती ही सगळ्या संस्कृतीची जणनी आहे. तिचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गोंडीभाषा ही प्राचीन भाषा आहे. तिला जीवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही भाषा बोलली पाहिजे, शक्यतो याच भाषेतून व्यवहार केला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
संचालन गोंडीधर्म महासंघाचे सचिव गणेश हलामी, प्रास्ताविक नंदकिशोर नैताम तर आभार सी. आर. नैताम यांनी मानले. यशस्वीतेसाठी पितृशक्ती भिमाल दल, मातृशक्ती जंगोम दल व युवा सोडूम दल यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gondidharma Sammelan at Maldugi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.