स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 02:09 IST2017-01-25T02:09:50+5:302017-01-25T02:09:50+5:30
खेडुले कुणबी समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये यश मिळावावे,

स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत जा
वनमाला नाकतोडे यांचे आवाहन : आरमोरी खेडुले कुणबी समाजाचा मेळावा
आरमोरी : खेडुले कुणबी समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये यश मिळावावे, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक वनमाला नाकतोडे यांनी केले.
खेडुले कुणबी समाजाच्या वतीने आरमोरी येथे दामोधर मंगल कार्यालयामध्ये वधू- वर परिचय मेळावा, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आणिक महिलांच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मेळाव्याचे उद्घाटन खेडुले कुणबी समाज चंद्रपूरचे अध्यक्ष पुरूषोत्तम सहारे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. हितेंद्र धोटे, प्रा. काशिनाथ मातेरे, प्रा. प्रकाश बगमारे, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष धनपाल मिसार, माजी शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठलराव देशमुख, ऋषी लांडे, सरपंचा मनीषा दोनाडकर, भीवाजी नाकतोडे, गोपीनाथ नखाते, मनोहर सुंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नाकतोडे म्हणाले की, सामान्य परिस्थितीतून समोर जावून विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत उतरावे. या परीक्षेचा नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणे कठिण नाही, असेही नाकतोडे म्हणाल्या.
मान्यवरांच्या हस्ते हरिओम अण्णा ठाकरे, सौरभ भावे, अंजली चौधरी या दहावीतील विद्यार्थ्याचा तसेच बारावीतील केतकी पिलारे, अभिनव कुथे, जयंत भावे यांचा सत्कार करण्यात आला. वाणिज्य शाखेतील प्रशांत दर्वे, अनिल कार यांना सन्मानित करण्यात आले. अभियंता परीक्षा पास झालेले जयश्री धोटे, हिचा सत्कार करण्यात आला. निशिकांत बुल्ले याने नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्याचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आलेले चंद्रशेखर प्रधान यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ. रामहरी राऊत, संचालन जयंत राऊत तर आभार दौलत धोटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी खरकाटे, परमेश्वर भावे, नंदू नाकतोडे, किशोर ठाकरे, भाऊराव तलमले, मेघराज बुराडे, शालिकराम राऊत, दौलत कुथे, मंजूषा दोनाडकर, पुष्पा दिवटे, कविता दोनाडकर, बाळकृष्ण ढोरे, सदाशिव धोटे, मधुकर दोनाडकर व समाजबांधवांनी सहकार्य केले. सदर मेळाव्याला गडचिरोली जिल्हाभरातून खेडुले कुणबी बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)