ईश्वरभक्तीनेच माणसाचे जीवन सुधारते - विजयकुमार पल्लोड
By Admin | Updated: February 17, 2016 01:07 IST2016-02-17T01:07:53+5:302016-02-17T01:07:53+5:30
सध्याच्या धावपळ व व्यस्ततेच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती हाच

ईश्वरभक्तीनेच माणसाचे जीवन सुधारते - विजयकुमार पल्लोड
गडचिरोली : सध्याच्या धावपळ व व्यस्ततेच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. ईश्वर भक्तीने व नामस्मरणाने माणसाचे जीवन निश्चित सुधारते, असा उपदेश औरंगाबाद येथील प.पु. पंडित विजयकुमार पल्लोड यांनी केला.
शर्मा परिवार गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी येथील श्रीद्वारका नगरीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपदेश करताना ते बोलत होते.
भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या पूर्वी सकाळच्या सुमारास शहरातून कलश शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर पूजाअर्चा करून भागवत कथा ज्ञानयज्ञाला दुपारी २ वाजता सुरूवात झाली. साधना व तपस्यामय जीवनानेच माणसाला सूख मिळते. भागवत कथा ऐकल्याने माणसाच्या शरीराला ऊर्जा मिळते. गुरू-शिष्याच्या संबंधाशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. सद्य:स्थितीत सोना, चांदी, पेट्रोल, डिझेल, तांदूळ, गहू भौतिक वस्तुंची भाववाढ झाली आहे. त्यानुसार भक्तीज्ञानाचेही भाव वाढले आहेत. प्रत्येक व्यक्तीला मानसन्मान देऊन कार्य करा, सत्कर्म करताना येणाऱ्या अडचणीला खचून न जाता अडचणींचा खंबीरपणे सामना करून सत्कर्म अविरत सुरू ठेवा, असा सल्लाही पंडित पल्लोड महाराज यांनी यावेळी दिला. काल, कर्म, स्वभाव हे माणसाच्या दु:खाचे खरे कारण आहेत. काळानुसार सत्कर्म करून पुण्य मिळवा. माणसाचा स्वभाव बदलत नाही. चांगल्या स्वभावाने वागून मंत्रपठणातून आत्मिक शांती निर्माण करा. खोटे बोलून प्रचंड धन कमाविता येते. मात्र माणसाच्या जीवनात सुख, शांती व आत्मिक समाधान फारसे मिळत नाही. खाण्यावर नियंत्रण ठेवून सत्य बोलून तसेच सत्य वागून मानवी जीवन सार्थक करा, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)