सिरोंचाला अस्वच्छतेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:40+5:30

ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सिरोंचा शहराचा विकास होऊन कायापालट होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र नगर पंचायत अस्तित्वात येऊनही अपेक्षित विकास कामे होत नसल्याने नागरिकांचा नगर पंचायत प्रशासनावर रोष दिसून येत आहे. सदर नगर पंचायतीमध्ये कार्यरत मुख्याधिकारी सतत बदलत असल्याने विकासाचा वेग मंदावला आहे.

Glue the head to the unclean | सिरोंचाला अस्वच्छतेचा विळखा

सिरोंचाला अस्वच्छतेचा विळखा

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष : नाली उपसा व शहर स्वच्छतेचे काम थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : १७ सदस्यीय नगर पंचायतीचा कारभार नगराध्यक्ष व मुख्याधिकारी सांभाळत आहेत. मात्र गेल्या बऱ्याच दिवसांपासून नालीतील गाळ उपसा व शहर स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या सिरोंचा शहराला घाणीचा विळखा बसल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सिरोंचा शहराचा विकास होऊन कायापालट होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र नगर पंचायत अस्तित्वात येऊनही अपेक्षित विकास कामे होत नसल्याने नागरिकांचा नगर पंचायत प्रशासनावर रोष दिसून येत आहे.
सदर नगर पंचायतीमध्ये कार्यरत मुख्याधिकारी सतत बदलत असल्याने विकासाचा वेग मंदावला आहे. परिणामी मूलभूत प्रश्न व विकासाचा मुद्दा घेऊन कुणाला जाब विचारावा, अशा मन:स्थितीत शहरवासी दिसून येत आहेत. नगर पंचायतीची निवडणूक होऊन येथे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व नगरसेवक पदावर विराजमान झाले. मात्र प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख असलेल्या मुख्याधिकाऱ्यांशिवाय मूलभूत सोयीसुविधा व विकासात्मक कामे करणे शक्य होत नाही. नेमकी हीच अडचण येथे येत आहे.
नाली उपसा व स्वच्छतेच्या कामाची निविदा प्रक्रिया महिनाभर रखडली होती. शेवटी या कामासाठी नागपूर येथील कंत्राटदार मिळाला. या कंत्राटदाराने मजुरांमार्फत स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. मात्र अल्प मजूर असल्याने शहराच्या सर्व वॉर्डात योग्यरित्या नाली व रस्ते सफाईचे काम होत नाही. परिणामी रस्त्यालगत, चौकाचौकात व बºयाच ठिकाणी कचरा अस्थाव्यस्त पडून आहे. स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावर मांस व चामडे फेकून देण्यात आले आहे. परिणामी दुर्गंधी सुटली आहे.

स्थायी मुख्याधिकारी मिळेना
सिरोंचा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून यापूर्वी अनेक तहसीलदारांनी प्रभार सांभाळला आहे. यामध्ये भारत नंदनवार, कुलभूषण रामटेके, रमेश जसवंत आदींचा समावेश आहे. सद्य:स्थितीत विशाल पाटील हे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Glue the head to the unclean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.