४७ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप

By Admin | Updated: December 23, 2016 01:04 IST2016-12-23T01:04:52+5:302016-12-23T01:04:52+5:30

वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने तालुक्यातील एकलपूर येथे गावातील सर्वसाधारण

Giving gas to 47 beneficiaries | ४७ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप

४७ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप

एकलपुरात कार्यक्रम : वन विभाग व समितीचा पुढाकार
देसाईगंज : वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने तालुक्यातील एकलपूर येथे गावातील सर्वसाधारण प्रवर्गातील ४७ लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप वन परिक्षेत्राधिकारी एन. जी. चांदेवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच वर्षा कोडापे, तंमुस अध्यक्ष चंदू दुफारे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्ही. टी. शिवणकर, पोलीस पाटील, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. वातावरणातील प्रदुषणामुळे जीवांना धोका निर्माण होत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने यावर पायबंद घालणे गरजेचे आहे. वृक्षांचे संवर्धन केल्यास पर्यावणाचे संवर्धन शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्षतोड न करता सरपणाऐवजी गॅसचा वापर करावा, असे आवाहन वन परिक्षेत्राधिकारी चांदेवार यांनी केले.
नागरिकांनी वन व वन्य जीवांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला एकलपूर येथील नागरिक व वन कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Giving gas to 47 beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.