आम्ही विकलेला उत्कृष्ट मका आम्हाला परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:25+5:302021-07-22T04:23:25+5:30
शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये व त्यांना मका विक्री करणे सोयीचे व्हावे यासाठी मुरूमगाव आणि झाडापापडा येथे आधारभूत ...

आम्ही विकलेला उत्कृष्ट मका आम्हाला परत करा
शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये व त्यांना मका विक्री करणे सोयीचे व्हावे यासाठी मुरूमगाव आणि झाडापापडा येथे आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्या केंद्रावर १६ शेतकऱ्यांचा १,१७६ क्विंटल मका खरेदी करण्यात आला; परंतु शासनाने दिलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांनी विकलेल्या मक्याची लॉट एन्ट्रीच केली नाही. त्यामुळे त्या मक्याचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळाले नाही. मका विक्रीचे पैसे मिळतील म्हणून शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपला मका परत नेला नाही.
उपप्रादेशिक कार्यालयाकडून शेतकऱ्यांना त्यांचा मका घेऊन जाण्याबाबत सांगितले जात आहे; परंतु शेतकरी आपला मका नेण्यास तयार आहे. आम्ही विकलेला उत्कृष्ट मकाच आम्हाला परत द्या, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
या निवेदनावर परमेश्वर गावडे, मयालू मडावी, मिलनसिंग मालिया, अपित तुलवी, जयंती लकडा, आनंदा गावडे, गाडो आतला, मतृ टेकाम, रजनी वरखंडे, जाणीबाई मतलामी, बनू तुलावी, नरेश चिमूरकर, चमरू समरथ, मंगेश आतला, मेहताब कुदराम आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
210721\img_20210625_140114_193.jpg
गोडाऊन मद्ये ठेवलेला मका