एकस्तर वेतनश्रेणीचा विनाअट लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:40+5:302021-08-25T04:41:40+5:30
पालकमंत्री एकनाथ शिंदे २१ ऑगस्ट राेजी गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते काेराेना याेद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयाेजन गडचिराेली येथे करण्यात ...

एकस्तर वेतनश्रेणीचा विनाअट लाभ द्या
पालकमंत्री एकनाथ शिंदे २१ ऑगस्ट राेजी गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते काेराेना याेद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयाेजन गडचिराेली येथे करण्यात आले हाेते. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना दिले.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय रद्द करावा. जिल्हा परिषदेत कार्यरत अप्रक्षित बडतर्फ प्राथमिक शिक्षकांना पूर्ववत सेवेची संधी मिळवून देण्यात यावी. बी.डी.एस. प्रणाली सुरू करावी. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची पदे भरण्यात यावीत. प्राथमिक शिक्षक संवर्गातील बदली प्रक्रिया सुरू करण्यात यावी. गडचिराेली नगर परिषदेत विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची पदे भरावीत, आदी मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. समस्या साेडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, जिल्हाध्यक्ष चक्रपाणी कन्नाके, कार्याध्यक्ष चंदू रामटेके, धानाेरा तालुकाध्यक्ष दीपक भैसारे, आदी उपस्थित हाेते.