शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कर्मचाऱ्यांना एसजीएसपी सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:36 IST

स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एसजीएसपी अकाऊंट (स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज) सेवा सुरू केली आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांना अनेक सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ शिक्षकांना मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत एसजीएसपी सेवा सुरू करावी,.........

ठळक मुद्देनिवेदन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एसजीएसपी अकाऊंट (स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज) सेवा सुरू केली आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांना अनेक सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ शिक्षकांना मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत एसजीएसपी सेवा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रंचित पोरेड्डीवार यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या वेतन पॅकेज विषयावर सविस्तर चर्चा केली. बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, व्यवस्थापक अलमपटलावार उपस्थित होते.शिक्षकांनी चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या १७ मुद्यांवर सकारात्मक चर्चा करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत खाती असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना एसजीएसपी सेवेचा लाभ दिला जाईल, असे आश्वासन प्रंचित पोरेड्डीवार यांनी दिले. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, रमेश रामटेके, राजेश बाळराजे, डंबाजी पेंदाम, गुलाब मने, रवी मुलकलवार, वणुजी बुद्धे, सुरेश नाईक, राकेश सोनटक्के, संजय लोणारे, तुषार चांदेवार, प्रवीण पोटवार, प्रणव देवनाथ, सुनील धात्रक, बंडू सिडाम, भूषण भोयर उपस्थित होते.या आहेत प्रमुख मागण्याकर्मचाºयांना एसएमएस चॉर्जेसमध्ये १०० टक्के सूट देण्यात यावी, शिक्षकांचे एटीएम चॉर्जेस १०० टक्के माफ करावे, ओडीवर एक टक्का व्याजदर कमी करावा, धनादेश घेताना १०० टक्के सूट द्यावी, एनईएफटी/आयटीजीएस/डीडी वरील शुल्कात सूट द्यावी, सेव्हिंग खातेधारकाचे दोन महिन्याचे वेतन न झाल्यास त्यास १ लाख २० हजार रुपये ओडी शाखेत मंजूर करावे, तसेच ओव्हर ड्राफ्ट मंजूर करून द्यावे, इतरांना देण्यात येणाºया व्याजदरात अर्धा टक्के सूट देण्यात यावी, लॉकर सुविधेवर १५ टक्के सवलत लागू करावी, खात्यावरील जमा रकमेवर एफडीनुसार व्याज द्यावे, एकूण पगाराच्या १२ पट एवढे वैयक्तिक कर्ज मंजूर करावे, शून्य शिलकीवर खाते सुरू ठेवावे, कार लोन, होम लोन, शैक्षणिक कर्जात इतरांपेक्षा शिक्षकांना अर्धा टक्के सूट द्यावी, मोबाईल बँकिंग चॉर्जेस नि:शुल्क करावे, खातेधारकांना १५ लाखांपर्यंत अपघात विमा द्यावा, खातेदारांचे खाते भीम अ‍ॅप सोबत कनेक्ट करावे आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया