कोठरी बौध्द विहारास पर्यटन स्थळाचा अ दर्जा द्या
By Admin | Updated: January 15, 2017 01:39 IST2017-01-15T01:39:04+5:302017-01-15T01:39:04+5:30
केंद्रीय पर्यटन विभागाने घोट परिसरातील कोठरी बौध्द विहारास पर्यटन स्थळाचा अ दर्जा देऊन विकसीत करावे,

कोठरी बौध्द विहारास पर्यटन स्थळाचा अ दर्जा द्या
गडचिरोली : केंद्रीय पर्यटन विभागाने घोट परिसरातील कोठरी बौध्द विहारास पर्यटन स्थळाचा अ दर्जा देऊन विकसीत करावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील मार्र्कंडादेव, सोमनूर, कालेश्वर, टिपागड या स्थळांचाही विकास करावा. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर नव्या पुलाचे बांधकाम करून गडचिरोली-बोरमाळा रस्त्याचे रूंदीकरण, डांबरीकरण करावे, जिल्ह्यातील वनोपजावर विशेष पॅकेजद्वारे स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन उद्योग उभारावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आले आहे. या निवेदनावर चंद्रशेखर भडांगे, हेमंत जंबेवार, माधुरी केदार, प्रकाश ताकसांडे, मिलिंद घरोटे, तुळशीराम सहारे, मनोहर हेपट, संजय बर्वे, शांता रामटेके, गजानन बारसिंगे, रूपाली वलके, अब्दुल लतीफ शेख, देविदास आखाडे, सत्यनारायण कलंत्री आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. कोठरी बौध्द विहार विदर्भातील बौध्द समाज बांधवांचे श्रध्दास्थान आहे. मात्र येथे अद्यापही भौतिक सोयीसुविधांचा अभाव आहे.