गडचिरोलीत मेडिकल कॉलेज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:24+5:30
शिवसेना शहर शाखा गडचिरोलीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना नागपूर येथे भेटून बुधवारी निवेदन देण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू कावळे व गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रीमहोदयांची भेट घेतली. यावेळी नवनाथ उके, गजानन नैताम, दिलेश सुरकार, वेदांत कापकर, संजय आकरे, चेतन कंदुकवार आदी पदाधिकाऱ्यांसह गडचिरोलीत शिवसैनिक हजर होते.

गडचिरोलीत मेडिकल कॉलेज द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात शासकीय रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी त्याची संख्या कमी आहे. परिणामी दुर्गम भागातील अनेक नागरिकांना मोठ्या आजारावरील औषधोपचार वेळेवर मिळत नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व सेवा बळकट करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात शिवसेना शहर शाखा गडचिरोलीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना नागपूर येथे भेटून बुधवारी निवेदन देण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू कावळे व गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रीमहोदयांची भेट घेतली. यावेळी नवनाथ उके, गजानन नैताम, दिलेश सुरकार, वेदांत कापकर, संजय आकरे, चेतन कंदुकवार आदी पदाधिकाऱ्यांसह गडचिरोलीत शिवसैनिक हजर होते.
निवेदनात म्हटले आहे की, वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्न प्रलंबित असून तो लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. या रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात येणार आहे त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरात वाढीव प्रकल्पासाठी जागा देण्यात यावी. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोह उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र उद्योग निर्मितीबाबत काम सुरू करण्यात आले नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी उद्योग उभारण्याची कार्यवाही करावी तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे द्यावे, अशी मागणी केली आहे.