वनहक्क जमिनीचे पट्टे द्या
By Admin | Updated: August 21, 2016 03:39 IST2016-08-21T03:39:46+5:302016-08-21T03:39:46+5:30
सामूहिक वनहक्काचे दावे निकाली काढून तत्काळ जमिनीचे पट्टे देण्यात यावे,

वनहक्क जमिनीचे पट्टे द्या
खासदारांना निवेदन : राजपूर पॅच वासीयांची मागणी
अहेरी : सामूहिक वनहक्काचे दावे निकाली काढून तत्काळ जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील राजपूरवासीयांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, रामपूर मार्गावरील राजपूर पॅचवासीय अतिक्रमीत जमिनीवर शेती करीत आहेत. येथील २२ कुटुंबीयांनी सदर वनहक्क पट्ट्याची सर्व पूर्तता करून तसेच वनहक्क समिती व ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत सादर करून प्रशासनाकडे वनपट्ट्याची मागणी केली आहे. मात्र सदर प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही करून पट्टे देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी मागणी खा. अशोक नेते यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.
यावेळी बाबुराव कोहळे, रवींद्र ओल्लालवार, रवी नेलकुद्री, क्रिष्णा मंचालवार तसेच राजपूर पॅच येथील महेश बाकीवार, सुरेश मंचार्लावार, भीमराव कपेलवार, राजू संगर्तीवार, मधुकर बाकीवार व ग्रामस्थ हजर होते.