कोरोना योद्ध्यांना सन्मानजनक मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:26+5:302021-04-21T04:36:26+5:30
मागील वर्षी कोरोनाची लागण मार्च महिन्यापासून सुरू झाली. तेव्हा कंत्राटी तत्त्वावर कोरोना वॉर्डात सेवा देण्यासाठी काही युवकांना बोलाविण्यात आले. ...

कोरोना योद्ध्यांना सन्मानजनक मानधन द्या
मागील वर्षी कोरोनाची लागण मार्च महिन्यापासून सुरू झाली. तेव्हा कंत्राटी तत्त्वावर कोरोना वॉर्डात सेवा देण्यासाठी काही युवकांना बोलाविण्यात आले. सुरवातीला कोरोनाच्या दहशतीने काही युवक सेवा देणे बंद केले तर काही युवक जिवाची पर्वा न करता सेवा देत राहिले. त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर यंत्रणांमार्फत नाममात्र १२ हजार रुपये मानधन देण्यात आले. तरीही कोरोनाग्रस्त समाजबांधवांची सेवा ते अविरतपणे सुरू ठेवली. दरम्यानच्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली. त्यामुळे काही कोरोना योद्धांना कामावरून कमी करण्यात आले. अल्पावधीतच परत कोरोनाने रूद्ररूप धारण केल्याने परत त्याच कोरोना योद्धांना कामावर परत बोलाविण्यात आले. मात्र, आता त्यांना मागील वर्षीपेक्षा कमी मानधन देण्यात येत असल्याची ओरड आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाची दहशत अधिक आहे. मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली असल्याने जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाही परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांच्या व परिचारिकांच्या सोबतीने कंत्राटी वॉर्डबॉय जिद्दीने आरोग्य सेवा देत आहेत. तरीही त्यांना मागील वर्षीपेक्षा कमी म्हणजे ९ ते १० हजार रुपये मानधन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. भविष्यात आरोग्य विभागाच्या होणाऱ्या पदभरतीत कोरोना योद्ध्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशीही मागणी ब्राह्मणवाडे यांनी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.