केरळप्रमाणेच वीज माेफत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:26+5:302021-08-12T04:41:26+5:30
महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत राज्याचे वीजमंत्री आहेत. त्यांनीही दिवाळीपूर्वी राज्यातील जनतेला १०० युनिट ...

केरळप्रमाणेच वीज माेफत द्या
महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत राज्याचे वीजमंत्री आहेत. त्यांनीही दिवाळीपूर्वी राज्यातील जनतेला १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती, परंतु त्याची आजवर अंमलबजावणी झाली नाही. कोविड-१९ महामारी दरम्यान राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद झाल्या होत्या यामुळे सामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत. दुसऱ्या लाटेदरम्यान अनेकांनी वीजबिल भरले नाही, त्यामुळे आता वीज कनेक्शन कापण्याची कार्यवाही करीत आहेत. हे अन्यायकारक आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार ज्याप्रमाणे नियमित २०० युनिट वीज मोफत देत आहे त्याप्रमाणे राज्यातील जनतेला सूट द्यावी अशी मागणी केली आहे, असे आपचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण सावसाकडे यांनी सांगितले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्यामार्फत खा. राहुल गांधी यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी आप जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, विधानसभा प्रमुख अरुण मोहोड, शहरप्रमुख साहिल बोदेले, मोहित सूर्यवंशी, मयूर सिडाम, रोशन उईके, अजित कोनडो, अखिल मेश्राम, सुरेश गेडाम, रुपेश सावसाकडे, शुभम खेवले आदी उपस्थित होते.