चार महिन्यांचे वेतन त्वरित द्या

By Admin | Updated: July 11, 2015 02:27 IST2015-07-11T02:27:20+5:302015-07-11T02:27:20+5:30

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे वेतन मागील चार महिन्यांपासून रखडले आहे.

Give up to four months' salary immediately | चार महिन्यांचे वेतन त्वरित द्या

चार महिन्यांचे वेतन त्वरित द्या

बीडीओंना निवेदन : कास्ट्राईब संघटनेची मागणी
भामरागड : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे वेतन मागील चार महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी शिक्षकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन त्वरित निकाली काढावे, अशी मागणी कास्ट्राईब संघटनेच्या वतीने संवर्ग विकास अधिकारी सज्जनपवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भामरागड तालुक्यातील जि. प. शाळेच्या शिक्षकांचे माहे मार्च ते जून पर्यंतचे वेतन अद्यापही देण्यात आले नाही. त्यामुळे ते त्वरित अदा करावे, शिक्षक सहकारी पतसंस्थेची रक्कम संबंधित पतसंस्थेला पाठवावी, घरभाडे व प्रोत्साहन भत्ता कपात न करता थकबाकी द्यावी, जुलैचे वेतन वाढीसह अदा करावे, २४ वर्ष सेवा दिलेल्यांना निवड श्रेणी लागू करावी आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष टेंभुर्णे, पद्मावार, नरोटे, मेश्राम, कन्नाके, साळवे, बांबोळे, जमदाळ, सुरपाम व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Give up to four months' salary immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.