आरोग्य सुविधांचा लाभ सर्वांना द्या
By Admin | Updated: January 24, 2016 01:16 IST2016-01-24T01:16:20+5:302016-01-24T01:16:20+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहावे, ..

आरोग्य सुविधांचा लाभ सर्वांना द्या
खासदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश : जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची सभा
ंंगडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहावे, जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, याकरिता आरोग्य विभागाने नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्यात, लाभ द्यावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले.
जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची सभा गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडली. या बैठकीत खा. अशोक नेते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी रणजीतकुमार, आ. डॉ. देवराव होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, रूग्णालयात असलेली रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठवावे, जिल्ह्यातील आरोग्य विभागात असलेली रिक्त पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही बेठकीत खा. अशोक नेते यांनी सांगिंतले. (शहर प्रतिनिधी)
तालुक्यांसाठी १०८ रूग्णवाहिका
जिल्ह्यातील १२ तालुक्यांसाठी १०८ रूग्णवाहिका सेवा सुरू करण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. मागील डीपीसीच्या बैठकीत यावर पारित झालेला प्रस्ताव शासनाला पाठविण्याचेही ठरविण्यात आले.