अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत मानधन तत्काळ द्या- दहिवडे
By Admin | Updated: October 7, 2015 02:31 IST2015-10-07T02:31:25+5:302015-10-07T02:31:25+5:30
मागील वर्षीचा थकीत मानधन तत्काळ द्यावे, महिला व बालकल्याण विभागाकडे आहे. या विभागाला दिल्या जाणाऱ्या निधीत शासनाने यावर्षी कपात केली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत मानधन तत्काळ द्या- दहिवडे
मुलचेरा : मागील वर्षीचा थकीत मानधन तत्काळ द्यावे, महिला व बालकल्याण विभागाकडे आहे. या विभागाला दिल्या जाणाऱ्या निधीत शासनाने यावर्षी कपात केली आहे. याचा परिणाम बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर होत आहे. शासनाने या विभागाकडे लक्ष घालून या विभागाच्या निधीत वाढ करावी, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे.
अंगणवाडी महिलांचा मेळावा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे विठाबाई मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे बोलत होते. पुढे मार्गदर्शन करताना दहिवडे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन आपली आई धुणीभांडी करीत होते, असे गहिवरून सांगतात. मात्र याच सात वर्षावरील धुणीभांडी करणाऱ्या महिलांकरिता पेंशनची घोषणा का करीत नाही, असा सवाल उपस्थित केला. २६ जानेवारीला १० लाख रूपयांचा कोट घालताना त्यांच्या हाताला थरकाप का सुटला नाही, मोदी हे देशातील नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून बेबी त्रिनगरीवार यांनी हक्काच्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. मेळावा यशस्वीतेसाठी सिंधू पेंदोर, मलीना बाला, ज्योत्स्ना समजदार, योगीता गुरनुले, बेबी शेडमाके, सुनीता पंधरे, चंद्रकला सिडाम, लीला गलबले, भारती मालाकार यांनी सहकार्य केले.