शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सर्व कर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ द्या

By admin | Updated: February 5, 2016 01:04 IST

शासनाने शेतकऱ्यांचे खासगी सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र सावकारांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार कच्च्या स्वरूपात होत असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पत्रकार परिषद : सावकारग्रस्त शेतकरी संघटनेची मागणीकुरखेडा : शासनाने शेतकऱ्यांचे खासगी सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र सावकारांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार कच्च्या स्वरूपात होत असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावकारांच्या संपूर्ण कच्च्या व पक्क्या व्यवहारांची चौकशी करून या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने कुरखेडा येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. राज्य शासनाने ३० नोव्हेंबर २०१४ पूर्वी शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडे वस्तू गहाण ठेवत घेतलेले संपूर्ण कर्ज व व्याजाची रक्कम माफ करीत सावकारांकडून लाभार्थ्यांची यादी मागितली. मात्र शासनाकडे भरणा करावयाचा कर वाचविण्याकरिता बहुसंख्य नोंदणीकृत सावकारांनी मोठ्या प्रमाणावर कच्च्या बिलावरच व्यवहार केले. कुरखेडा तालुक्यात तीन ते चार हजार सावकारी कर्जदार असतांना केवळ १७६ लाभार्थ्यांची यादी सावकारांनी शासनाला दिली. परिणामी अनेक कर्जदार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास १३ फेब्रुवारीला कुरखेडा तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कवरके, प्रल्हाद धोंडगे, धर्मा दरवडे, शिवा राऊत, उत्तम कीर्तनीया, हेमंत कवरके, नामदेव लोहंबरे, पुंडलिक दादगाये, लता सहारे, मुरलीधर जोगे, ऋषी सोनकुसरे, गुरूदेव मारगाये, सुदाम सुकारे, देवनाथ नैताम, झोडे यांनी दिला आहे.