विद्यार्थिनीचे प्रेत विहिरीत आढळले

By Admin | Updated: December 2, 2015 01:11 IST2015-12-02T01:11:45+5:302015-12-02T01:11:45+5:30

स्थानिक स्व. इंदिरा गांधी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीचे प्रेत मंगळवारी वसतिगृहाला लागून असलेल्या विहिरीत शोधल्यानंतर आढळले.

The girl's phantom was found well | विद्यार्थिनीचे प्रेत विहिरीत आढळले

विद्यार्थिनीचे प्रेत विहिरीत आढळले

आरमोरीतील घटना : पोलिसांत तक्रार; दोषींवर कारवाई करण्याची मागणी
आरमोरी : स्थानिक स्व. इंदिरा गांधी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीचे प्रेत मंगळवारी वसतिगृहाला लागून असलेल्या विहिरीत शोधल्यानंतर आढळले. या घटनेमुळे आरमोरी शहरात खळबळ उडाली आहे. मृतक विद्यार्थिनीचे नाव तृणाली महेंद्र चौधरी असे असून ती आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, तृणाली महेंद्र चौधरी ही विद्यार्थिनी सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासून आरमोरी येथील स्व. इंदिरा गांधी वसतिगृहात राहून महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारला सदर विद्यार्थिनी सकाळपासून बेपत्ता होती. या संबंधिची माहिती वसतिगृहातील चौकीदारांनी संबंधित मुलीच्या आई-वडिलांना फोनवरून दिली. त्यानंतर मुलीचे आई-वडील व भाऊ आरमोरी येथे आले. वसतिगृहाच्या अधीक्षकांना विचारणा केली असता, सकाळी तुमची मुलगी हजर होती. मात्र नंतर ती कुठे गेली हे माहीत नसल्याचे उत्तर वसतिगृहाच्या अधीक्षिकेने दिले. मुलीच्या आई-वडिलाने वसतिगृह व परिसरात शोधाशोध केल्यानंतर मुलीचा पत्ता लागला नाही. त्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान वसतिगृहालगत असलेल्या विहिरीत गर टाकून पाहिल्यानंतर मुलीचे प्रेत आढळून आले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करून जोपर्यंत अटक करण्यात येईल तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मुलीच्या कुटुंबियांनी घेतला. दरम्यान आ. क्रिष्णा गजबे यांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)

 

Web Title: The girl's phantom was found well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.