मुलगी पहायला आले अन् लग्न लावून गेले

By Admin | Updated: May 16, 2017 00:47 IST2017-05-16T00:47:40+5:302017-05-16T00:47:40+5:30

आजच्या काळात हाती पैसा असला की तो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने दाखवून आपली ‘श्रीमंती’ जगजाहीर करण्याची हौस सर्रास पहायला मिळते.

The girl came to see and got married | मुलगी पहायला आले अन् लग्न लावून गेले

मुलगी पहायला आले अन् लग्न लावून गेले

उच्चशिक्षित दाम्पत्य : बोथरा परिवाराने ठेवला आदर्श
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आजच्या काळात हाती पैसा असला की तो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने दाखवून आपली ‘श्रीमंती’ जगजाहीर करण्याची हौस सर्रास पहायला मिळते. पण गडचिरोलीतील बोथरा (जैन) आणि धुळ्याच्या खिंवसरा परिवारातील सदस्य तथा उच्चशिक्षित दाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्यक खर्चाला फाटा देत ‘चट मंगनी पट ब्याह’ करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
धुळे येथील सोहनलालजी खिंवसरा हे रविवारी (दि.१४) त्यांचे मेकॅनिकल इंजिनिअर असलेले सुपूत्र संदेश यांच्यासाठी मुलगी पहायला बोथरा परिवाराच्या निमंत्रणावरून गडचिरोलीत आले. धनराजजी बोथरा (जैन) यांची मुलगी क्षमा हीसुद्धा एमटेक असून पुण्यात नोकरीला आहे. दोघांनीही एकमेकांना पसंत केले. दोन्ही परिवाराचीही पसंती झाली आणि त्यातूनच फाजिल खर्च आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे? असा प्रस्ताव समोर आला. दोन्ही परिवारांनी त्याला होकार भरला आणि अवघ्या काही तासातच सायंकाळी ७ वाजता कौटुंबिक वातावरणात मोजक्या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थितीत जैन धर्मपद्धतीने क्षमा आणि संदेश विवाहबद्ध झाले.या झटपट आदर्श विवाहासाठी रमेश बोथरा, डॉ.गणेश जैन, निरज जैन (बोथरा), रामेश्वरलाल काबरा, घिसुलाल काबरा, रमेश सारडा, दिलीप सारडा, दिलीप जाजू, पवन झंवर, सुभाष असावा, महेश काबरा यांच्यासह जैन समाजातील काही महिलांनी पुढाकार घेऊन नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.

Web Title: The girl came to see and got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.