काेराेना डेंग्यूची लक्षणे सारखीच, तातडीने चाचणी करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST2021-07-25T04:30:40+5:302021-07-25T04:30:40+5:30

पावसाळ्यात आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका आहे. साेबतच आता काेराेनाचीही साथ सुरू आहे. काेराेना व डेंग्यू राेगाची लक्षणे ...

Get tested for similar dengue symptoms, immediately | काेराेना डेंग्यूची लक्षणे सारखीच, तातडीने चाचणी करून घ्या

काेराेना डेंग्यूची लक्षणे सारखीच, तातडीने चाचणी करून घ्या

पावसाळ्यात आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका आहे. साेबतच आता काेराेनाचीही साथ सुरू आहे. काेराेना व डेंग्यू राेगाची लक्षणे सारखीच असल्याने रुग्ण गाफील राहण्याची शक्यता आहे. दाेन्ही राेगांचा वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णाची स्थिती गंभीर हाेण्याचा धाेका राहताे. त्यामुळे वेळीच चाचणी करून घेऊन त्यानुसार उपचार सुरू करणे आवश्यक आहे.

बाॅक्स

चाचणी कुठली

काेराेनासाठी- आरटीपीसीआर, अँटिजेन

डेंग्युसाठी- एलआयझा, एनएस-१

बाॅक्स

अंगदुखी, डाेकेदुखी, ताप

-काेराेना व डेंग्यू या दाेन्ही आजारांमध्ये अंगदुखी, सांधेदुखी, डाेकेदुखी, ताप ही लक्षणे आढळून येतात. यामुळे रुग्णाला संभ्रम निर्माण हाेण्याची शक्यता राहते. त्यामुळे वेळीच तपासणी हाेणे आवश्यक आहे.

- डेंग्यू रुग्णाचा रक्तजल नमुना घेऊन ताे तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविला जाते.

बाॅक्स

पाणी उखळून प्या, मच्छरदाणीचा वापर करा

-डेंग्यू हा राेग डासांमुळे पसरते. त्यामुळे झाेपतेवेळी मच्छरदाणीचा वापर करावा. डेंग्यूच्या डासाची पैदास स्वच्छ पाण्यात हाेते. त्यामुळे जवळपासच्या जलसाठ्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.

- पावसाळ्यात पाणी उखळूनच प्यावे.

बाॅक्स

वर्षनिहाय डेंग्यूचे रुग्ण

वर्ष रुग्ण

२०१८-१३

२०१९- १०

२०२०-१६

२०२१-१

Web Title: Get tested for similar dengue symptoms, immediately