शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 5:00 AM

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले. 

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; लसीकरणाबाबतचे गैरसमज वेळीच दूर करा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा ना. शिंदे यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी त्यांनी विविध सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील १० तालुक्यांसाठी मंजूर केलेले १० ऑक्सिजन जनरेशन प्लांट तातडीने पूर्ण करण्याची सूचना शिंदे यांनी प्रशासनाला केली. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांशी दिवसातून २ वेळा तरी संपर्क साधण्यास त्यांनी सांगितले. या ऑनलाइन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी दीपक सिंगला, सीईओ कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जि. आ. अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते. 

लसीकरणासाठी व्यापक जनजागृतीची गरज जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती जाणून घेताना या भागातील आदिवासी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेऊन आदिवासींच्या मनातील ही भीती दूर करण्याचे प्रयत्न करा, असे पालकमंत्री म्हणाले.

मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने मान्सूनच्या परिस्थितीचा आढावादेखील यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यातील नागरिकांना ३ महिन्यांच्या रेशनचा पुरवठा करणे, सर्पदंश आणि विंचुदंश यावरील औषधांचा सर्व तालुक्यातील आरोग्य केंद्रात साठा करून ठेवणे, जिल्ह्यातील गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी आणून ठेवणे अशी सर्व मान्सूनपूर्व कामे  वेळीच पूर्ण करावीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावा लागणारा औषधांचा पुरवठा  येत्या १५ दिवसांत करून ठेवावा, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत प्रशासनाला केल्या.

लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार कराकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. त्यासोबतच सध्या राज्यात वेगाने वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगासाठी लागणारी सारी सज्जता करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या रोगात रुग्णांचा मृत्युदर जास्त असल्याने जिल्ह्यात याचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्यास त्यांनी सांगितले. या रोगाची औषधे महाग असल्याने त्यांचा पुरेसा साठा आधीच करून ठेवावा, असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाचशे इंजेक्शन्सची ऑर्डर दिल्याची माहिती दिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याguardian ministerपालक मंत्री