७५ हजार बालकांचे आधार कार्ड काढा

By Admin | Updated: June 13, 2015 01:49 IST2015-06-13T01:49:08+5:302015-06-13T01:49:08+5:30

जिल्ह्यात ९ लाख २१ हजार ४९५ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे.

Get a base card of 75 thousand infants | ७५ हजार बालकांचे आधार कार्ड काढा

७५ हजार बालकांचे आधार कार्ड काढा

१५ आॅगस्ट पर्यंत : विविध योजनांच्या विकास कामाचा पालकसचिवांनी घेतला आढावा
गडचिरोली : जिल्ह्यात ९ लाख २१ हजार ४९५ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे. ० ते सहा वयोगटातील ३२ हजार ६४९ बालकांचे सुध्दा आधार कार्ड काढण्यात आले आहे. ७५ हजार बालकांचे आधार कार्ड काढण्याचे काम बाकी आहे. हे काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश गडचिरोलीचे पालक सचिव विकास खारगे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी आदी उपस्थित होते. यावेळी पालकसचिव विकास खारगे यांनी चालू आर्थिक वर्षातील जिल्हा विकास निधी खर्च करताना निधीची परिणामकारकता व नियोजित वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही केल्या. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी १५२ गावात ४ हजार ११८ जलयुक्त शिवार योजनेतून कामे सुरू आहे. जिल्ह्यात १ हजार ६८९ कामे हाती घेण्यात आले असून १ हजार १८० कामे पूर्ण करण्यात आले आहे. ५०९ कामे प्रगतीपथावर आहे. कृषी विभागांतर्गत २६, जि.प. सिंचन विभागांतर्गत ३२ अशा एकूण ५८ गावात ११५ कामे लोकसहभागातून घेण्यात आले आहे, अशी माहिती खारगे यांना दिली. वन विभागांतर्गत खोल समतल सलगचर तयार करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Get a base card of 75 thousand infants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.