पोलीस अधिकारी व जवानांना महासंचालकांचे पदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 01:14 IST2017-04-27T01:14:25+5:302017-04-27T01:14:25+5:30

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह

General of Police officers and jawans released the medals | पोलीस अधिकारी व जवानांना महासंचालकांचे पदक जाहीर

पोलीस अधिकारी व जवानांना महासंचालकांचे पदक जाहीर

१ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान : दरोडेखोरी व चोऱ्यांच्या तपासातील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान
गडचिरोली : पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र पोलीस महासंचालकाकडून जाहीर करण्यात आले आहे. १ मे २०१७ रोजी हा सन्मान या अधिकाऱ्यांना दिला जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक दामदेव वामनराव मंडलवार, विलास श्रीमंत मोरे, संदीप पूजा मंडलिक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक महारूद्र परजने, अशोक भापकर, सागर शिंदे, दिलीप ढेरे, नंदकुमार कदम, सुनील गायकवाड, मल्हार थोरात, अक्षय अनिलकुमार ठिकणे, अनिल लवटे यांनाही पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. गुप्तवार्ता अधिकारी राजो भिवगडे, बबलू पंगडा यांना सेवेत सतत १५ वर्ष उत्तम कार्यासाठी हे पदक दिले जाणार आहे. तसेच पोलीस हवालदार नथ्थू धोटे, तुळशिराम मडावी, मुखरू उसेंडी यांच्यासह पोलीस नाईक विनोद सोनवने, साधू सिडाम, जमिल खॉ पठाण, पंकज हुलके, भास्कर होळीकर, भोजराज शेबे, किरणकुमार दुर्गम, रवीकांत मडावी, संतोष नैताम, किशोर कुमोटी, राजेश रेवतकर, रतीराम पोरेटी, साजीद खान, तेजराव नैताम, लक्ष्मण आलाम, विलास पोरतेट, रवींद्र नैताम, उमाजी आचला, रामचंद्र धुर्वे, अविनाश सडमेक, रवींद्र कुंभारे, संजय मसराम, मोहन तोरेम, करण देवकते, कमलेश अरका आदींना दरोडेखोर व गुन्हेगारांच्या टोळीविरूद्ध केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस महासंचालकाचे पदक दिले जाणार आहे. याशिवाय पोलीस शिपाई दानसू दुग्गा, छगन तलांडे, रवींद्र मडावी, डोलू नरोटे, संतोष पोटावी, तौसिब शेख, रमेश आत्राम, राकेश हिचामी, अमर गौरकार, रामसू नरोटे, गणेश उईके, दसरू कुरसामी, विलास पवार, चिन्ना महाका, आग्रमन रहाटे, मझहरखान दौलतखान पठाण, राजू गायकवाड, सुरेश रापंजी, बडजू दहिफळे, गणेश मडावी, प्रमोद दुर्गे, महेंद्र कुमरे, लोकेशकुमार लाडे, सुरेश मडावी, चंद्रमुनी टोम्पे, सुधीर ठाकूर, पुनमकुमार वंजारी, वेल्ला वरसे, सोपान दुबे, संदीप वसाके, आदिनाथ फड, राजेश कुंजाम, मोहन उसेंडी, विनोद आत्राम आदींना सन्मानित करण्यात येणार आहे. सहायक गुप्तवार्ता अधिकारी अमितकुमार पांडे यांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच गडचिरोली येथील सहायक पोलीस निरीक्षक मनोहर हिरालाल कोरेटी, पोलीस शिपाई बापू सुरमवार यांना २०१६ चे पोलीस शौर्यपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय पोलीस नाईक दिलीप कोरेटी, देवनाथ काटेंगे, बाबुराव पदा, पोलीस शिपाई दिनकरशहा कोरेटी, संजय उसेंडी, प्रवीण भासरकर यांनाही शौर्यपदक जाहीर झाले आहे.

Web Title: General of Police officers and jawans released the medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.