शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद स्थायी समितीत पुन्हा गाजला शताब्दी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:42 IST

चामोर्शी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शताब्दी महोत्सवासाठी आयोजक म्हणून आमदार डॉ.देवराव होळी यांनी बजावलेली भूमिका आणि महोत्सवासाठी गोळा केलेल्या देणग्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला.

ठळक मुद्देचौकशी करण्यास टाळाटाळ : दाद न मिळाल्यास आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शताब्दी महोत्सवासाठी आयोजक म्हणून आमदार डॉ.देवराव होळी यांनी बजावलेली भूमिका आणि महोत्सवासाठी गोळा केलेल्या देणग्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला. बुधवारी जि.प.च्या स्थायी समितीत अ‍ॅड.राम मेश्राम आणि अतुल गण्यारपवार या दोन्ही ज्येष्ठ सदस्यांनी चौकशीची मागणी लावून धरली.या महोत्सवासाठी जिल्हा परिषदेची परवानगी न घेता जमविलेल्या देणग्यांचा हिशेब कुठे आहे? असा प्रश्न करीत जि.प.च्या परवानगीशिवाय महोत्सव किंवा देणग्या वसुली करण्याचा अधिकार आमदारांना नसताना त्यांनी ते काम केले. त्या देणग्यांचा हिशेबही दिला नाही. शिवाय त्या पैशातून शाळेची रंगरंगोटीही केली नाही. मग शताब्दी महोत्सव साजरा करण्यामागील हेतू काय होता? असा सवाल या सदस्यांनी केला. त्यावर अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी त्या निधीचा आमच्याशी संबंध नाही, ते पैसे जि.प.ला दिले नाही त्यामुळे चौकशी करता येणार नाही असे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला. सीईओ शंतनू गोयल यांनीही या प्रकाराबद्दल अनभिज्ञता दर्शवून कायदा तपासून निर्णय घेतला जाईल, असे उत्तर दिले. मात्र सदस्यांनी समाधान झाले नाही. त्यामुळे जि.प.ने या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई केली नाही तर आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा या सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.यावेळी कोनसरी येथे वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी तसेच लखमापूर बोरी येथे मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरती ओपीडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी आरोग्य विभागाकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.मेंढा येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत अभियंता घोडमारे यांनी गडबड करून आपल्या माणसाला काम देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अ‍ॅड.राम मेश्राम यांनी करून चौकशीची मागणी केली. याशिवाय जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरी यांनी गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगार युवकांची संख्या वाढल्यामुळे नक्षलग्रस्त म्हणून येथील युवकांना नोकरभरतीत प्राधान्य देण्याची मागणी केली. त्यासाठी शासनाने प्रकल्पग्रस्त, भूपंकग्रस्तांप्रमाणे नक्षलग्रस्त म्हणून प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केली. तो ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.अरसोडा ग्रामपंचायतच राहणारप्रस्तावित आरमोरी नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास लगतच्या अरसोडा ग्रामपंचायतने विरोध दर्शविला आहे. ग्रामपंचायतचा तो ठराव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय बुधवारच्या स्थायी समितीत घेण्यात आला. पालोरा व शेगाव या ग्रामपंचायती मात्र आरमोरी नगर परिषदेत समाविष्ठ होणार आहेत. या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कामांसाठी नवीन दरसूचीला मंजुरी देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :zpजिल्हा परिषद