आलापल्लीत गवळण गायन व राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST2021-09-02T05:19:22+5:302021-09-02T05:19:22+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन गजानन गादेवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून शिला श्रीनिवास चौधरी, प्रिया प्रशांत ठेपाले, सोनाली मद्देर्लावार, गीतांजली ...

आलापल्लीत गवळण गायन व राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा
कार्यक्रमाचे उद्घाटन गजानन गादेवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून शिला श्रीनिवास चौधरी, प्रिया प्रशांत ठेपाले, सोनाली मद्देर्लावार, गीतांजली बंडावार, तर विशेष अतिथी म्हणून साबांविचे उपकार्यकारी अभियंता मीनल जाधव, आदी उपस्थित होते. राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण शिला चौधरी व प्रिया ठेपाले यांनी केले.
गवळण गायन स्पर्धेचे परीक्षण सोनाली मद्देर्लावार, गीतांजली बंडावार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रेणू गागापुरवार, जागृती गादेवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर कमेटी आलापल्ली यांनी केले.
(बॉक्स)
हे ठरले बक्षिसाचे मानकरी
- यात १ ते ५ वयोगटांतील कृष्ण वेशभूषा प्रथम पुरस्कार शिवांश सागर डेकाटे, तर द्वितीय आयुष पुल्लूरवार, तर राधा वेशभूषा प्रथम पुरस्कार आर्ना महेश गागापूरवार, तर द्वितीय पुरस्कार ख़ुशी सिसोदिया यांना मिळाला. तसेच ६ ते १० वयोगटांतील कृष्ण वेषभूषा प्रथम पुरस्कार सिद्धी पडिशालवार, तर द्वितीय चैतन्य कोलपाकवारला मिळाला.
- राधा वेशभूषा प्रथम पुरस्कार गोजिरी काळे, तर द्वितीय नव्या नागरेला प्राप्त झाला. गवळण गायन स्पर्धा प्रथम पुरस्कार किरण जैस्वाल, तर द्वितीय जोत्स्ना पोरेड्डीवार, तर तृतीय रूपाली नागापुरे यांना मिळाला. तसेच गौळण गायन स्पर्धेत वयोगट १ ते १८ यात प्रथम अनुष गौटमवार, द्वितीय देवकी नालमवार, तर तृतीय देवयानी नालमवार यांनी मिळविला.
310821\3110img-20210830-wa0075.jpg
गोकुळअष्टमी निमित्य आलापल्ली येथे गौळण गायन स्पर्धा आणि राधा कृष्ण वेशभूषा कार्यक्रम संपन्न