शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

गट्टेपल्लीला मिळाली बांबूची टीपी

By admin | Updated: June 7, 2015 02:02 IST

गावकऱ्यांच्या संघर्षानंतर वन विभागाने तालुक्यातील गट्टेपल्ली ग्रामसभेला बांबू विक्रीचे अधिकार बहाल केले असून गावकऱ्यांच्या हातात टीपी बूक दिले आहे.

गावकऱ्यांनी केला प्रशासनाकडे संघर्ष : गावाला मिळाले बांबू विक्रीचे अधिकार
एटापल्ली : गावकऱ्यांच्या संघर्षानंतर वन विभागाने तालुक्यातील गट्टेपल्ली ग्रामसभेला बांबू विक्रीचे अधिकार बहाल केले असून गावकऱ्यांच्या हातात टीपी बूक दिले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार गट्टेपल्ली ग्रामसभेने कक्ष क्र. २४२ व २४३ मध्ये बांबूच्या कापणीस सुरुवात केली होती. बांबूची विक्री करण्यासाठी टीपी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे केली होती. परंतु हालेवारा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गट्टेपल्ली गावाचा प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे ग्रामसभेचे सल्लागार तथा राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीचे सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्त्वात गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन झालेली चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर गट्टेपल्लीचा समावेश पर्याय क्रमांक दोनच्या यादीत करण्यात आला. उपवनसंरक्षकांच्या निर्देशानुसार सीएफ कंद, पचारे, आरएफओ गिते, बारस्कर यांनी टीपी बूक तयार केले. सदर टीपी बूक आलापल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामसभेचे अध्यक्ष मधुकर पुडो, घिसु पुडो व ग्रामसभेचे सल्लागार सुरेश बारसागडे यांना प्रदान करण्यात आला.
टीपी बूक प्राप्त झाल्याने गट्टेपल्ली ग्रामसभेला बांबू विक्रीचे अधिकार प्राप्त झाले आहेत. सदर टीपी मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक उईके, विस्तार अधिकारी हाडके, रामटेके, संवर्ग विकास अधिकारी लुटे, ठेपाले यांच्यासह गावातील इतरही नागरिकांनी सहकार्य केले. गावकऱ्यांना बांबू विक्रीचे रितसर अधिकार प्राप्त झाल्याने त्यांच्या श्रमाची योग्य किंमत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)