इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रवेशद्वार
By Admin | Updated: September 19, 2015 02:07 IST2015-09-19T02:07:15+5:302015-09-19T02:07:15+5:30
इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने या भाषेची विद्यार्थ्यांनी भीती बाळगू नये, विविध संस्था तसेच खासगी कंपन्यांमध्ये ...

इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रवेशद्वार
लालसिंग खालसा : महात्मा गांधी महाविद्यालयात कार्यक्रम
आरमोरी : इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने या भाषेची विद्यार्थ्यांनी भीती बाळगू नये, विविध संस्था तसेच खासगी कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या संधी हस्तगत करण्याचा प्रयत्न करावा, यात व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य दिले जाते. इंग्रजी भाषेच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषा व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रवेशद्वार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लालसिांग खालसा यांनी केले.
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित स्पोकन इंग्लिश कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून खालसा बोलत होते. प्रास्ताविकातून नोमेश मेश्राम यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्वप्नील ढोमणे तर आभार प्रा. दयाराम मेश्राम यांनी मानले. प्रमोद म्हशाखेत्री, करिश्मा मेश्राम, प्रशांत दडमल यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)