४५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप
By Admin | Updated: December 25, 2016 01:48 IST2016-12-25T01:48:29+5:302016-12-25T01:48:29+5:30
प्रशासन आपल्या दारी, जागर शासकीय योजनांचा महाराजस्व अभियानांतर्गत कासवी येथे विस्तारीत समाधान शिबिर शुक्रवारी पार पडले.

४५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप
कासवीत समाधान शिबिर : धनादेश व विविध प्रकारच्या दाखले प्रदान
जोगीसाखरा : प्रशासन आपल्या दारी, जागर शासकीय योजनांचा महाराजस्व अभियानांतर्गत कासवी येथे विस्तारीत समाधान शिबिर शुक्रवारी पार पडले. या शिबिरात पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत ४५ लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले. तसेच शौचालय बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेश आणि नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न व सातबारा आदी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे तर अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक रनजीत पाटील, जि.प. सदस्य लक्ष्मी मने, पं.स. सभापती सविता भोयर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई, डॉ. प्रिया गेडाम, प्राचार्य लालसिंग खालसा, नामदेव सोरते, सरपंच पुष्पलता तिवाडे, शशिकांत गेडाम, प्रा. ठाकरे, विजय गोरडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी महसूल, कृषी, पंचायत समिती, आरोग्य वन, रेशीम उद्योग, कृषी उत्पन्न बाजार समिती, पशुवैद्यकीय विभाग आदींच्या वतीने स्टॉल लावून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी तहसीलदार वलथरे, संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, संचालन प्रा. विजय रेवतकर, प्रा. लोमेश मेश्राम यांनी केले तर आभार शशिकांत गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न.पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या रासेयोचे स्वयंसेवक, प्रा. तसेच मानवी हक्क समिती दत्तक ग्राम समिती व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)