दिग्गजांच्या प्रवेशाने भाजपात गर्र्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 02:07 IST2016-11-16T02:07:33+5:302016-11-16T02:07:33+5:30
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात ग्रामीण ...

दिग्गजांच्या प्रवेशाने भाजपात गर्र्दी
पालकमंत्री व खासदार उपस्थित : राजन खुणे, बौद्धकुमार लोणारेसंह येमलीचे सरपंच भाजपात दाखल
कुरखेडा/अहेरी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात ग्रामीण भागात विविध राजकीय पक्षातून येणारे नेते व कार्यकर्त्यांचा ओढा प्रचंड वाढला आहे. कुरखेडा तालुक्यातील गुरूनुलीचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष राजनपाटील खुणे, कुरखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती बौध्दकुमार लोणारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तर एटापल्ली तालुक्यातील येमलीचे, गुरूपल्ली येथील सरपंच, उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सतत भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याने ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाची स्थिती भक्कम होत आहे.
कुरखेडा येथील राजीव भवनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपा प्रदेश सदस्य नाना नाकाडे, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, भाजपा तालुका अध्यक्ष राम लांजेवार, तालुका संघटक जलाल सय्यद, शहर अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, जि.प. सदस्य वर्षा कौशीक, पं.स. सदस्य चांगदेव फाये, खेमनाथ डोंगरवार, त्र्यंबक नाकाडे, नगरसेवक बबलू हुसैनी, नागेश फाये, रामहरी उगले, उमेश वालदे, नंदीनी दखणे, स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख आदी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान काँग्रेसचे श्रीराम दुग्गा, प्रल्हाद कराडे, पुंडलिक तोंडरे यांनी सुध्दा प्रवेश केला. प्रवेशितांचा खासदार व आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेशामुळे भाजपाची स्थिती आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असा आशावाद खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.
अहेरी येथील रूक्मिणी महलात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत गुरूपल्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच दशरथ अडगोपुलवार व येमली ग्रामपंचायतीच्या सरपंच विमल गावडे यांच्यासह सदस्य बाळू घिसू आत्राम, उमेश जुजा तलांडे, तिरूपती माधव मडावी, पौरी व्यंकटी पुलगम, कमल वेलादी, मधुकर मडावी, सुरेंद्र मडावी, विजय मडावी, राजू हिचामी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कार्यक्रमा याप्रसंगी आयोजित एटापल्लीचे तालुका अध्यक्ष विजय नल्लावार, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, अहेरीचे तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, अहेरी नगर पंचायतीचे नगरसेवक गिरीष मद्देर्लावार आदी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)