चामोर्शीतील दिना धरणाच्या कालव्यात टाकला जाताहे कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:22 IST2019-04-15T22:22:45+5:302019-04-15T22:22:58+5:30
घोट परिसरातील रेगडी येथील दिना धरणाचा कालवा चामोर्शी तालुक्याच्या सिंचन सुविधेसाठी शहरालगत आणण्यात आला आहे. या दिना धरणाच्या कालव्यात चामोर्शी शहरातील नागरिक टाकाऊ कचरा फेकत आहेत. परिणामी सदर कालव्याचा परिसराला डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

चामोर्शीतील दिना धरणाच्या कालव्यात टाकला जाताहे कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : घोट परिसरातील रेगडी येथील दिना धरणाचा कालवा चामोर्शी तालुक्याच्या सिंचन सुविधेसाठी शहरालगत आणण्यात आला आहे. या दिना धरणाच्या कालव्यात चामोर्शी शहरातील नागरिक टाकाऊ कचरा फेकत आहेत. परिणामी सदर कालव्याचा परिसराला डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
आष्टी मार्गालगत जाणाºया दिना धरणाच्या नहरात टाकाऊ कचरा फेकला जात असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांची डोकेदुखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिना धरणाच्या नहरात आजुबाजूला असलेली नागरिक व व्यावसायिक दैनंदिन केरकचऱ्याची साफसफाई झाल्यानंतर नहरात हा कचरा टाकत आहेत. यामध्ये प्लॉस्टिकचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने शेतकºयांसाठी हा कचरा डोकेदुखी ठरणार आहे.
यावर्षी दिना नहरातील गाळाचा उपसा करून पाणी वाहून जाण्याची दिशा व्यवस्थित करण्यात आली. मात्र दिवसेंदिवस नहरात कचऱ्याचे ढिग दिसून येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा सुस्त आहे. दिना धरणाच्या नहरातून पाणी आल्यानंतर संपूर्ण कचरा वाहून जाऊन शेतात जमा होऊ शकतो. त्यामुळे शेतकºयांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भविष्यात निर्माण होणारी समस्या लक्षात घेऊन संंबंधित विभागाने सदर कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. सुका व प्लास्टिकयुक्त कचरा जाळून तो नष्ट करण्याची गरज आहे. मात्र याबाबत प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता दिसून येत आहे.
चामोर्शीत प्लास्टिकबंदी नाममात्रच
पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले. दरम्यान प्रशासनाच्या वतीने चामोर्शी शहर व तालुक्याच्या काही ठिकाणी प्लास्टिक जप्तीची मोहीम काही महिन्यापूर्वी राबविण्यात आली. मात्र अल्पावधीतच ही मोहिम बंद पडली. परिणामी चामोर्शी शहरात प्लास्टिक वापराचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पानठेल्यावरील खर्रा पन्नीत मिळत असल्याने अनेक ठिकाणी पन्न्यांचे ढिग दिसून येत आहेत.